शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गचे पालकमंत्री जाहीर; ठाकरेंच्या जवळच्या अनिल परबांना रत्नागिरीचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:25 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती.

मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यांचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज रात्री मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 

यामध्ये मुंबई उपनगरची जबाबदारी आदित्य उद्धव ठाकरे  यांना देण्यात आली आहे. तर  कोल्हापूरचे पालकमंत्रीपद बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले आहे. तर रत्नागिरीची जबाबदारी मातोश्रीच्या जवळचे मानले जाणाऱ्या अनिल परब यांच्याकडे देण्यात आली आहे. 

शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आणि राणेपूत्र निलेश राणे यांच्यामध्ये सख्य नाही. नुकतीच निलेश राणे यांनी सामंतांच्या पदवीवरून जोरदार टीका केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी सामंत यांनी डांबरातूनही पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद सांभाळणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे. 

ठाकरे सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; अजित पवार पुणे तर आदित्य ठाकरेंना 'या' जिल्ह्याची जबाबदारी

सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद अनिल परब यांना देण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती. मात्र, त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. परब हे कणकवलीच्या हरकुळ गावात मुळचे राहणारे आहेत. 

निलेश राणे यांनी काय केली होती टीका?

राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. सामंत यांनी पदवी खरी असेल, पण हा माणूस 100 टक्के बोगस आहे, असा आरोप केला होता. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सावंतवाडीत येऊन निलेश राणे यांचे कान टोचले आहेत. 

उदय सामंतांची पदवी खरीखुरी; चंद्रकांत पाटलांनी टोचले निलेश राणेंचे कान

 

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNilesh Raneनिलेश राणे