शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg ZP Election Voting 2026: बांद्यात ईव्हीएममध्ये बिघाड; पहिला मतदानाचा हक्क बजावून 'ती' गेली लग्न मंडपात, जिल्ह्यात ११:३० वाजेपर्यंत २५.७२ टक्के मतदान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 7, 2026 13:16 IST

सिंधुदुर्ग : कोकणचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या ...

सिंधुदुर्ग : कोकणचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन तासांच्या संथ प्रतिसादानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा वेग प्रचंड वाढला असून सकाळी ११:३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५.७२ टक्के इतके भरघोस मतदान झाले आहे. माधवी दाभोलकर या नववधूने मतदान केंद्र परुळे केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन ती लग्न मंडपात गेली. जिल्ह्यात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात (सकाळी ७:३० ते ९:३०) मतदारांचा प्रतिसाद काहीसा संथ होता, तेव्हा केवळ १०.६४ टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यानंतर मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या आणि दुसऱ्या टप्प्यात (९:३० ते ११:३०) मतदानाचा टक्का थेट २५.७२ टक्क्यांवर पोहोचला.वरवड्यात पालकमंत्र्यांचे सहकुटुंब मतदानपालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपला हक्क बजावला. "सिंधुदुर्गच्या विकासासाठी आणि नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे," अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.बांद्यात ईव्हीएममध्ये बिघाडएकडे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना बांदा येथील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे मतदानाची प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. तांत्रिक पथकाने मशीन दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले, मात्र यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांचा काहीसा खोळंबा झाला.दुपारी 'उन्हाचा कडाका', सायंकाळी 'धडाका'!सध्या दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदान केंद्रांवर काहीशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र, सायंकाळी ४ वाजेनंतर पुन्हा एकदा मतदानाची मोठी लाट येण्याची शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली आहे. ८ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ४२ जागांवर कोण बाजी मारणार, याचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg ZP Election 2026: Voting brisk despite EVM glitch; bride votes.

Web Summary : Sindhudurg ZP election sees enthusiastic voting; 25.72% turnout by 11:30 AM. A bride voted before her wedding. EVM issues in Banda caused delays. Minister Nitesh Rane voted with family.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६sindhudurgसिंधुदुर्गVotingमतदानNitesh Raneनीतेश राणे