शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणार १९० पदांची भरती, मराठा समाजाला १४ पदे आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:17 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणार १९० पदांची भरतीमराठा समाजाला १४ पदे आरक्षित राहणार आरोग्य, अभियंता, ग्रामसेवक संवर्गाच्या जास्त जागा

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकाचवेळी ग्रामविकास विभागाकडील ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्गजिल्हा परिषदेत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत १९० पदे रिक्त असून त्यात आरोग्य, अभियंता व ग्रामसेवक या संवर्गाची पदे सर्वाधिक आहेत.जिल्हा परिषद अंतर्गत २३ विभागात १२९२ पदे मंजूर असून त्यातील १११९ पदे भरलेली आहेत. १६ मे २०१८ पर्यंत १५८ पदे रिक्त होती. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत अजून १५ तर ३१ मे २०१९ पर्यंत अजून १७ अशी एकूण १९० पदे रिक्त होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत यातील १६ विभागात रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाºया पदांची यादी निश्चित केली आहे. १९० पदे रिक्त जाणार आहेत.या मेगा भरतीत सर्वच रिक्त जागा भरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि सर्व पदे भरली जाणार आहेत. मराठा समाजाला नोकरीत १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रथम शासकीय भरती होत आहे. त्यामुळे विशेषत: मराठा समाजाच्या या भरतीत जास्त अपेक्षा आहेत.

शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागात खुल्या असलेल्या आरक्षणात १६ टक्के पदे मराठा समाजाला आरक्षित राहणार आहेत. एकूण पदांच्या १६ टक्के आरक्षण नाही. त्यामुळे १९० पदामध्ये १४ पदे मराठा समाजासाठी आरक्षित राहणार आहेत.याभरतीत आरोग्य सेवक महिला ४४, आरोग्य सेवक पुरुष २१, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) ३२, कंत्राटी ग्रामसेवक ३१, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २७ हि पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने त्याची भरती मोठी होणार आहे. औषध निर्माण अधिकारी ५, वरिष्ठ सहाय्यक ( लेखा ), ५, पर्यवेक्षिका १, विस्तार अधिकारी ( कृषी ) १, पशुधन पर्यवेक्षक १०, कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) २, कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ), कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) ७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, लघुलेखक ( उच्य श्रेणी ) १, आरोग्य पर्यवेक्षक १ अशाप्रकारे हि भरती होणार आहे.अधीक्षक कृषी कार्यालयात २२१ पदे रिक्तराज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी या अतिमहत्त्वाच्या विभागात अधिकारी व कर्मचारी मिळून २२१ पदे रिक्त आहेत. यात पाच तंत्र अधिकारी, एक सहाय्यक प्रशासन अधिकारी, २२ कृषी अधिकारी, एक अधीक्षक, तीन सहाय्यक अधिकारी, तीन वरिष्ठ लिपिक, २७ लिपिक, एक लघुलेखक निम्न, दोन लघुटंकलेखक, एक आरेखक, ३९ अणुरेखक, २७ पर्यवेक्षक , ३७ कृषी सहाय्यक, ७ वाहन चालक, एक टिलर आॅपरेटर, २३ शिपाई, १५ नर्सरी सहाय्यक व तीन प्रथम श्रेणी मजूर असा रिक्त पदांत समावेश आहे. एकूण ५६८ मंजूर पदे असून त्यातील ३४७ पदे भरलेली आहेत. होणाºया संभाव्य भरतीत किती भरती होते ? हे महत्वाचे आहे.लवकरच १९० पदांसाठी भरती होणार : पराडकरशासनाने आता नोकर भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मधील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील १९० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्थायी समिती सभेत दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग