शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे रखडलेले काम केव्हा सुरू होणार ?, आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:21 IST

वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.

ठळक मुद्देवेंगुर्लेतील मच्छिमार्केट : रखडलेले काम केव्हा सुरू होणार ? आश्वासनांची खैरात, प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही

सावळाराम भराडकर 

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.

आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेते रस्त्यानजीक बसल्याने वाहनचालकांना अशी कसरत करावी लागते.

स्वच्छतेत अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेसमोर अजूनही अद्ययावत मच्छिमार्केट, वाहनतळ, अरूंद रस्ते आदींसारखे ज्वलंत प्रश्न सोडविण्याचा पेच आहे. त्यात व्यक्तिगत हेवेदावे, राजकारण अशा विविध अंतर्गत कारणांनी वेंगुर्लेच्या विकासाला नेहमीच खीळ बसली आहे.

विकासात्मक उपक्रम राबविताना नागरिकांना विचारात न घेता काम सुरू करणे, काम सुरू असताना अर्धवट अवस्थेत ते काम नागरिकांकडून बंद पाडणे, ही नेहमीचीच समीकरणे बनली आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

अद्ययावत मच्छिमार्केटचा बऱ्याच वर्षांचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याने व मच्छी विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नसल्याने वाहनतळ, वाहतूक कोंडीसारखे प्रश्न नगरपरिषदेसमोर आ वासून उभे आहेत. विशेषत: रविवारच्या आठवडा बाजारादिवशी याचा फटका सर्वांनाच बसतो.सद्यस्थितीत पर्यायी जागा म्हणून मच्छी विक्रेते बसत असलेल्या जागेचा रविवारच्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी आश्रय घेतात. आधीच पर्यायी जागा कमी पडत असलेले मच्छी विक्रेते मग हॉटेल लौकिक समोरील रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटतात.त्यामुळे मुळातच अरुंद असलेला हा मार्ग मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीस निमंत्रण देतो. जोपर्यंत मच्छिमार्केट अद्ययावत होत नाही, तोपर्यंत वाहनतळ तसेच वाढती वाहतूक कोंडी यासारखे प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत.वाहतूक पोलिसांची वानवावाहनतळाची कमतरता असलेल्या बाजारपेठेत वाहतूक पोलीसही नसल्याने वाहनचालक तसेच बाजारहाट करणाऱ्यांची मार्ग काढताना पुरती दमछाक होते. यातून काहीवेळा वाहनचालकात शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही होतात. असे प्रकार टाळण्यासाठी येथे वाहतूक पोलीस ठेवणे अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार