शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सिंधुुदुर्ग : आशांच्या प्रोत्साहन भत्त्यात होणार दुप्पटीने वाढ, युनियनकडून घोषणेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 2:34 PM

आशा वर्कर्सना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता दुप्पटीने वाढवण्याच्या प्रधानमंत्री यांच्या घोषणेचे स्वागत सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन करीत आहे. आशा वर्कर्सनी सातत्याने दिलेल्या सेवांना त्यांच्या भाषणातून दिलेली मान्यता आणि त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात केलेली वाढ म्हणजे सीटूच्या नेतृत्वाखाली देशातील आशांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचाच परिपाक आहे.

ठळक मुद्देआशांच्या प्रोत्साहन भत्त्यात होणार दुप्पटीने वाढसीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनकडून स्वागत

कणकवली : आशा वर्कर्सना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता दुप्पटीने वाढवण्याच्या प्रधानमंत्री यांच्या घोषणेचे स्वागत सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन करीत आहे. आशा वर्कर्सनी सातत्याने दिलेल्या सेवांना त्यांच्या भाषणातून दिलेली मान्यता आणि त्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात केलेली वाढ म्हणजे सीटूच्या नेतृत्वाखाली देशातील आशांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचाच परिपाक आहे.

मोदी सरकारने ४५ व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार सर्व योजना कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून मान्यता व त्यांना १८ हजार किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि निवृत्तीवतन लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही व ठाम मागणी आम्ही करत आहोत.पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आशा वर्कर्सच्या मुलभूत प्रश्नांना हात न घालता, मोदींनी केलेली ही घोषणा केवळ आशांचे विविध राज्यांमधील निदर्शने, धरणे, मोर्चे, जेलभरो इ. लढे आणि पाच सप्टेंबरला पार पडलेल्या मजदूर किसान संघर्ष रॅलीचाच परिणाम आहे.आशा वर्कर्ससाठी जाहीर केलेल्या विमा योजना ह्या आधीच अस्तित्वात असलेल्या सरकारी योजना आहेत. त्यात नवीन काहीच नाही. सरकारच्या आशा वर्कर्स बाबतच्या या तुकड्या तुकड्याने मोल द्यायच्या तथाकथिक दयाभावनेच्या वृत्तीचा आशा युनियन तीव्र निषेध करत आहे. आणि जोपर्यंत त्यांना नियमीत कर्मचाऱ्यांचे अधिकार व लाभ मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांचे आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा इशारा देत आहे.तसेच राज्यस्तरावर सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याशी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच मंत्रालयात झाली. त्या सभेत खालील चर्चा झाली. त्यात सध्या भारतातील ज्या १४ राज्यांत आशांना ठराविक वेतन मिळत आहे. त्याबाबत माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.ग्रामीण व शहरी भागातील आशांच्या कामाचा मोबदला दुप्पटीने व तिप्पटीने वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या सभेत घेतला जाईल. मासिक, त्रैवार्षिक व इतर सर्व बैठकीच्या भत्त्यात भरीव वाढ करणार, आरोग्य सर्व्हेसाठी दररोज २० घराचा सर्व्हे केल्यास प्रतिदिन ७५ भत्ता देण्यात येईल, आशांना विनामोबदला कोणतीही कामे दिली जाणार नाहीत, इतर सर्व सजिस्टर ऐवजी एकच डायरी या महिन्यापासून दिली जाईल, गटप्रवर्तकांना स्कूटर व प्रतिकिमी पेट्रोल भत्ता व दैनंदिन भत्ता वाढीबाबत चर्चा झाली. तसेच आशा व गटप्रवर्तकाच्या सामाजिक सुरक्षाबाबत ठोस प्रस्ताव संघटनेने दिला.त्यांचे आरोग्य, आजारपण बाळंतपण व मुलांना शिक्षण, गटप्रवर्तकांना लॅपटॉप, नवीन सॉफ्टवेअर, आशांना सायकल याबाबत प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीस सीटूचे कॉ. विवेक मॉटेंंरो, कॉ. सलीम पटेल, कॉ. आनंदी अवघडे, कॉ. प्रिती मेश्राम, कॉ. साठे व इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.केंद्रीय आशा वर्कर्स समन्वय समितीच्या समन्वयक कॉ. रजना निरला यांनी सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आवाहन केले आहे की, आपल्या बऱ्यांच काळ थकित असलेल्या न्याय मागण्यांसाठी, भविष्यात होणाऱ्या सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांंच्या सार्वत्रिक संपासहित आगामी सर्व लढ्यात मोठ्या ताकदीनिशी उतरण्यासाठी सज्ज रहावे. तसेच पुढे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आशा व गटप्रवर्तक यांनी येऊन पुढे होणाऱ्या सर्व आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व सीटूचे हात बळकट करावे असे आवाहन सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी, खजिनदार निलिमा लाड व सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग