सिंधुदुर्ग : तळकोकणात दाखल झालेला मान्सून दमदार बरसत होता. मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी सिंधुदुर्गात मालवणला झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत बनले होते. पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.शहरातील काही सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागात तर धुवाँधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. मुसळधार पावसाने मान्सूनची दमदार सलामी दिली. शेतकरीवर्ग अपेक्षित पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांकडे वळला आहे.कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टीवर वाऱ्यांचाही वेग वाढणार असल्याचा संदेश सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.
सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाने मालवणला झोडपले, किनारपट्टीवर वाऱ्यांचाही वेग वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 13:11 IST
तळकोकणात दाखल झालेला मान्सून दमदार बरसत होता. मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी सिंधुदुर्गात मालवणला झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत बनले होते. पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाने मालवणला झोडपले, किनारपट्टीवर वाऱ्यांचाही वेग वाढणार
ठळक मुद्देमुसळधार पावसाने मालवणला झोडपलेकिनारपट्टीवर वाऱ्यांचाही वेग वाढणार