शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांच्या विरोधात उभादांडा येथे घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवत ग्रामस्थांनी केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:26 IST

अनधिकृत वाळू उपसा होत असून त्याला पालकमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करीत आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील ग्रामस्थांनी उभादांडा शाळा नं. २ येथे काळे झेंडे दाखवत व पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या विरोधात उभादांडा येथे घोषणाबाजीकाळे झेंडे दाखवत ग्रामस्थांनी केला निषेध

वेंगुर्ले : वाळू उपसा बंदी ही एका हॉटेल व्यावसायिकाच्या पाठीशी राहून केलेली आहे. काही ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा होत असून त्याला पालकमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करीत आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील ग्रामस्थांनी उभादांडा शाळा नं. २ येथे काळे झेंडे दाखवत व पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरुन वाळू उपशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचे कारण टांक येथील बड्या हॉटेल व्यावसायिकांशी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर-पाल येथील वाळू व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर परिणाम झालेला आहे.

आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य वाळू व्यावसायिकांना ते न्याय देऊ शकत नसल्याने सुमारे ५० वाळू व्यावसायिकांनी पालकमंत्री केसरकर हे उभादांडा येथील मंगेश पाडगांवकर आदरांजली कार्यक्रम आटोपून जात असताना काळे झेंडे व निषेधाच्या घोषणा देत आंदोलन छेडले.निषेधाच्या घोषणा व काळे झेंडे पाहून पालकमंत्र्यांनी वेंगुर्ले शहरात येण्याचा दौरा रद्द करुन ते शिरोड्याच्या दिशेने निघून गेले. पालकमंत्री केसरकर यांनी आपला मार्ग आमच्या आंदोलनामुळे बदलला हा आमचा विजय असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग