शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, सांगेली येथे घरावर झाडे कोसळली, सावंतवाडीत पावसाचा शिडकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 21:52 IST

Unseasonal Rain In Sindhudurg: हवामान खात्याने कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.

सावंतवाडी - हवामान खात्याने कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.सह्याद्री पटयात सांगेली, माडखोल, कलंबिस्त आदी गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे.

काही गावात तर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे रस्त्यावर झाडेही कोसळून वाहतूक कोंडी झाली होती. हवामान खात्याने विदर्भ मराठवाडा व कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दोन दिवसापूर्वीच वर्तवला होता. त्याप्रमाणे शुक्रवारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहि ठिकाणी दमट हवामान होते तर आंबोली चौकुळ परिसरात पाऊस कोसळला होता शनिवारी ही सकाळपासून हवामान दमट होतेच मात्र सायंकाळच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे झाले या वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसानही झाले.

त्याशिवाय अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी ही झाली होती. विशेषता सह्याद्रीच्या पट्ट्यात या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून जोरदार पाऊस ही कोसळला आहे. सांगेली गावात तर जोरदार पावसासह रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक काहि काळ ठप्प झाली होती सांगेली कडे  जाणा-या रस्त्यावर झाड कोसळल्याने तीन तास वाहतूक वाहतूक ठप्प होती ते झाड अखेर ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करण्यात आले. तर दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील काहि गावात ही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.ही सर्व सांगेली शिरशिंगे या गावांना लागून कुडाळ हद्दीत आहेत. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता.  सावंतवाडीत पावसाचा शिडकाव सावंतवाडीत सायंकाळ च्या सुमारास पावसाने शिडकाव केला यावेळी जोरदार वादळ झाले.या काळात विजेचा ही लपंडाव सुरू होता.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग