शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : उंबर्डे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण सुरुच, महिलांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:40 IST

विविध  मागण्यांसाठी उंबर्डे येथील शेकडो ग्रामस्थांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देउंबर्डे ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण सुरुमहिलांचाही समावेश, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वैभववाडी : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम तातडीने पूर्ण करुन त्या इमारतीचा वापर सुरु करावा. कुंभारवाडी येथे उभारण्यात आलेला ट्रान्सफार्मर तत्काळ कार्यान्वित करावा आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत या विविध मागण्यांसाठी सरपंच एस. एम. बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी, परशुराम दळवी, अमोल दळवी, उमर रमदुल, रत्नकांत बंदरकर, हमीद नाचरे, अलिबा बाबालाल नाचरे, यशवंत दळवी, विजय पांचाळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरु केले. उपोषणकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.उपोषण सुरु झाल्यानंतर तासाभरात वीज वितरणचे अधिकारी ग्रामस्थांशी चर्चेसाठी आले. त्यांनी कुंभारवाडीतील ट्रान्सफार्मरचे काम पूर्ण झाले आहे. विद्युत निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर तातडीने तो कार्यान्वित करण्यात येईल असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ट्रान्सफार्मर कधी सुरु करणार ते सांगा, असे विचारताच स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून १२ सप्टेंबरला ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील विद्युतीकरणाचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी ग्रामस्थांना दिले. तसे लेखी पत्रही बांधकामच्या उपअभियंत्यानी ग्रामस्थांना दिले.माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरतीच्या मागणी संदर्भात गटशिक्षणधिकारी मारुती थिटे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी ग्रामस्थांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा घडवून आणली. परंतु, लेखी आश्वासन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार शिक्षणधिकाऱ्यांनी शिक्षण विभागात ई-मेल पाठवित असल्याचे सांगितले. शिक्षणाअधिकाऱ्यांचे ते पत्र घेऊन सायकांळी उशिरा गटशिक्षणधिकारी थिटे पुन्हा उपोषणस्थळी गेले. मात्र, ते पत्र वाचल्यानतंर किती दिवसात भरती प्रकिया राबविणार याचा उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही पत्र स्विकारणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. त्यामुळे अधिकारी पुन्हा तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी गेले.दरम्यान जोपर्यंत शिक्षण विभाग रिक्त पदांच्या भरतीबाबत निश्चित कालावधीचे पत्र देत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरुच होते.

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग