शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कुडाळ महामार्गावर दुचाकींची धडक; एक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:22 IST

कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात वेताळबांबर्डे येथील दुचाकीस्वार मिलिंद कृष्णा साळसकर (४५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार हाही जखमी झाला असून त्याच्यावर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देकुडाळ महामार्गावर दुचाकींची धडक; एक ठार एक जखमी; ग्रामीण रुग्णालयात दाखल

कुडाळ : कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात वेताळबांबर्डे येथील दुचाकीस्वार मिलिंद कृष्णा साळसकर (४५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार हाही जखमी झाला असून त्याच्यावर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.कुडाळ केळबाईवाडी येथील दिनार खानविलकर (२०) हा दुचाकीने कुडाळ महामार्गावरून पिंगुळीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान दिनार रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील महामार्गावर आला असता समोरून दुचाकी घेऊन येणाऱ्या साळसकर यांच्या व दिनारच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघातातील दुचाकींची झालेली ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही दुचाकींच्या दर्शनी भागाचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही दुचाकींची समोरील चाके तुटली होती. या अपघातातील मृत मिलिंद साळसकर यांच्या ताब्यात नवीन नंबरप्लेट मिळालेली दुचाकी होती.

मिलिंद साळसकरया भीषण अपघातात साळसकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच ते जोराने खाली पडल्याने त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात होताच तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत साळसकर व दिनार या दोघांनाही तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र साळसकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी जाहीर केले. तर जखमी दिनार याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताचे वृत्त समजताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पडेलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

कुडाळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून याची माहिती दिनेश खानविलकर यांनी दिली आहे. मिलिंद साळसकर यांना अपघात झाल्याचे वृत्त समजताच वेताळबांबर्डे गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

साळसकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरकुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील मृत झालेले मिलिंद साळसकर हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्या निधनामुळे साळसकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात