शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दोन दिवसांत पाच जणांना सर्पदंश, दोघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 17:32 IST

दोन दिवसांत ५ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोघेजण अत्यवस्थ असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : दोन दिवसांत पाच जणांना सर्पदंश, दोघांची प्रकृती गंभीर  बोर्डवेत मलेरियाचा रुग्ण आढळला; उपजिल्हा रुग्णालयात उपचार

कणकवली : दोन दिवसांत ५ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोघेजण अत्यवस्थ असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला आहे.कासार्डे-अहिरेवाडी येथील सागर चंद्रकांत पाताडे (२७) याला रविवारी सकाळी सर्पदंश झाला. नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात ताबडतोब दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले.वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी-फाटकवाडी येथील भारती रघुनाथ रावराणे यांना सर्पदंश झाल्याने त्यांना प्रथम वैभववाडी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले.

तेथे केलेल्या उपचाराला त्यांनी साथ न दिल्यामुळे व विष न उतरल्यामुळे त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.कणकवली तालुक्यातील कुरंगवणे येथील भाग्यश्री भालचंद्र सुतार (२५) हिला घोणस जातीच्या सर्पाने दंश केल्यामुळे नातेवाईकांनी तिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला.कणकवली तालुक्यातील नागवे येथील रवींद्र महादेव सांगवेकर (४३) यांना सर्पदंश झाल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. कळसुली येथील ऋषिकेश सुतार (१५) या शाळकरी मुलाला सर्पदंश झाला. त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करून त्याला घरी पाठविले.पावसाच्या लहरीपणामुळे मलेरियाच्या साथीने डोके वर काढले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रविवारी बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला. त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.बोर्डवे परिसरातील रुग्णांनी मलेरियाच्या साथीबाबत भीती व्यक्त केली आहे. सध्या पाऊस जोरदार कोसळत असल्यामुळे व भातलावणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे ही साथ जोरात पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने या साथीबाबत खबरदारी घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल