शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करा : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:44 IST

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यातील त्यागभावना त्यांच्या वयाच्या किती तरुणांमध्ये आहे, याचा विचार करुन प्रत्येकाने शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करावा, असे मत आमदार नीतेश राणे यांनी सडुरे येथे शोकसभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देशहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करा  : नीतेश राणे सडुरे येथे शोकसभा; तालुकावासीयांतर्फे श्रद्धांजली

वैभववाडी : देशाच्या रक्षणासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये असली पाहिजे. त्याबरोबर आपण देशासाठी किती योगदान देतो याचेही चिंतन आवश्यक आहे. २८ वर्षीय शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यातील त्यागभावना त्यांच्या वयाच्या किती तरुणांमध्ये आहे, याचा विचार करुन प्रत्येकाने शहीद मेजर कौस्तुभ बनून जगण्याचा प्रयत्न करावा, असे मत आमदार नीतेश राणे यांनी सडुरे येथे शोकसभेत व्यक्त केले.पंचायत समिती व सडुरे ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या (रावराणे) मूळगावी रवळनाथ मंदिरात शोकसभा आयोजित केली होती.

यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, तहसीलदार संतोष जाधव, भाजप नेते अतुल रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, नगराध्यक्षा दीपा गजोबार, उपसभापती हर्षदा हरयाण, गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे, सरपंच अंकिता रावराणे, बंडू मुंडल्ये, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, विजय रावराणे, रवींद्र रावराणे, बाळा कदम, बंड्या सावंत, बाळा हरयाण, संपदा राणे, अ‍ॅड. अजितसिंह काळे, पुंडलिक साळुंखे, नवलराज काळे आदी उपस्थित होते.आमदार राणे पुढे म्हणाले, देशवासीयांचे रक्षण करण्याच्या भावनेने शहीद मेजर कौस्तुभ यांनी प्राणांची बाजी लावली. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे नाव घेतले जात आहे. आपण समाजात वावरताना देशाप्रती प्रत्येकाची हीच भावना असली पाहिजे. आपल्यातील एक तरुण गेल्याचे दु:ख सर्वांनाच आहे. परंतु, शहीद मेजर कौस्तुभ यांच्याप्रमाणे बनू शकतो का? याचा विचार आपण केला पाहीजे.कौस्तुभ राणेंचा अस्थिकलश २0 ला वैभववाडीत४उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखताना शहीद झालेले सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) यांचा अस्थिकलश सोमवारी (२0 आॅगस्ट) कोल्हापूरमार्गे सकाळी वैभववाडीत आणला जाणार आहे.

वैभववाडीतून हा अस्थिकलश त्यांच्या सडुरेतील घरी नेऊन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नेण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती शहीद मेजर कौस्तुभ यांचे चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी दिली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग