शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  जीवघेण्या सेल्फीतून पर्यटक बचावले, रॉक गार्डनजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:06 IST

रॉक गार्डन येथील समुद्रालगत सेल्फी काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. ते तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाईकांनी समुद्रात उडी घेत त्या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देजीवघेण्या सेल्फीतून पर्यटक बचावले, रॉक गार्डनजवळील घटना  समुद्राच्या लाटेमुळे तिघेजण समुद्रात बुडाले

मालवण : रॉक गार्डन येथील समुद्रालगत सेल्फी काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. ते तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाईकांनी समुद्रात उडी घेत त्या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.याबाबतची माहिती अशी की, ठाणे-मुंबई येथील विजय कृष्णा चव्हाण यांची पत्नी गीता, मुलगी मानसी, दिशा, मेहुणे प्रदीप प्रकाश कदम, पत्नी मेघना, सासू, सासरे असे सात जणांचे कुटुंब २३ मे रोजी पर्यटन सफरीसाठी निघाले होते. दहा दिवसांची त्यांची पर्यटन सफर होती.

रविवारी हे सर्वजण दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान रॉक गार्डन येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आले होते. रॉक गार्डन परिसरात समुद्रापासून काही अंतरावर असलेल्या खडकाळ भागात विजय चव्हाण यांच्या मुली मानसी (१९) व दिशा (१३), प्रदीप कदम (३८) हे छायाचित्र काढत होते.

छायाचित्रांसाठी समुद्री लाटेची वाट पाहत असताना अचानक समुद्राची उंच लाट खडकावर आदळली. या लाटेमुळे मानसी, दिशा व प्रदीप कदम हे समुद्रात फेकले गेले. हे तिघेही बुडत असल्याचे दिसताच त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच अन्य पर्यटकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.आपल्या मुली बुडत असल्याचे दिसताच विजय चव्हाण व त्यांचे नातेवाईक राज चौकेकर यांनी आपला जीव धोक्यात घालत समुद्रात उडी मारली आणि तिघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यात विजय चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाली. समुद्रात पडलेल्या तिघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले.मालवण समुद्रात पडलेल्या प्रदीप कदम यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSelfieसेल्फीAccidentअपघात