शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पतंग महोत्सवातून पर्यटनवृद्धी: दीपक केसरकर, निधी देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:02 IST

शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले.

ठळक मुद्देपतंग महोत्सवातून पर्यटनवृद्धी: दीपक केसरकरनवाबाग समुद्रकिनाऱ्यांवरील महोत्सवास पालकमंत्र्यांची भेटनवाबाग समुद्रकिनाऱ्यांवरील महोत्सवास पालकमंत्र्यांची भेट

सिंधुदुर्ग: माझा वेंगुर्ला संस्थेने पतंग महोत्सवातून पर्यटनवृद्धीचा प्रयत्न यशस्वीपणे राबविला आहे. देशी-विदेशी पर्यटकांची हजेरी मोठ्या प्रमाणात असेल अशा ठिकाणी भरविल्या जाणाऱ्या महोत्सव वा उपक्रमासाठी भविष्यात निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले. वेंगुर्ले बंदर ते नवाबाग जोडणारा झुलता पर्यटन पूल मे महिन्यापूर्वी पूर्ण होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.माझा वेंगुर्ला संस्थेने पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवाबाग समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय पतंग महोत्सवास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समिती सभापती यशवंत परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब, उभादांडा ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र्र डिचोलकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख विवेक आरोलकर, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनील डुबळे, नगरसेविका सुमन निकम, तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, ह्यमाझा वेंगुर्लाह्ण ग्रुपचे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, खेमराज कुबल, शशांक मराठे, कपिल पोकळे, जयंत बोवलेकर, राजेश घाटवळ, अमोल प्रभूखानोलकर, श्रीकृष्ण झांटये, अवधूत नाईक, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, शरद मेस्त्री, सूर्यकांत खानोलकर, पंकज शिरसाट यांच्यासह अन्य सर्व सदस्यांचा समावेश होता.पतंग महोत्सवात स्थानिकांनी लावलेल्या विविध प्रकारच्या खाद्य स्टॉलना, वाळूशिल्पांना माजी आमदार राजन तेली, भाजपाचे सरचिटणीस शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ग्लोबल कोकण संस्थेचे संजय यादव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह अन्य मान्यवरांनी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गkiteपतंग