शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : चक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:09 IST

कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा, कुडाळ तालुक्यात दाणादाण वीजपुरवठा खंडित, मालमत्तेचे मोठे नुकसान

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्याला पावसासह चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांची पडझड झाल्याने वीज वितरण विभागाचे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक गावातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू होते.दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसासमवेत वादळ झाल्याने वीज कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडाळ तालुक्यात चक्रीवादळासह पावसाचे जोरदार आगमन झाले.

शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळला.पावसापेक्षा वादळी वाऱ्यानेच कहर केल्याने तालुक्यात ठिकठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळल्याने तसेच भैरववाडी, लक्ष्मीवाडी व इतर काही भागात वीज तारा कोसळल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.शहरातील रेल्वेस्थानक मार्गाजवळ विद्युत खांब कोसळल्याने विद्युत तारा तुटून तेथील रस्त्यावर कोसळल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प होती. घटनास्थळी पोलीस व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी येत तेथील विद्युत तारा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.सोमवारी रात्री वादळी वाऱ्यात कुडाळ शहरातील केळबाईवाडी येथील प्रदीप कुडाळकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे सुमारे ३५ हजार रुपयांचे, तर तेथीलच उदय कुडाळकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडल्याने सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. कविलकाटे येथील रस्त्यानजीकचा मोठा वृक्ष कोसळला होता. एकंदरीत मान्सूनपूर्वने कुडाळ तालुक्यात जोरदार धमाका केला. याचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला आहे.ग्रामीण भागातही वादळाचा प्रभावतालुक्यातील कडावल, भडगाव बुद्रुक भागातही वादळाचा प्रभाव दिसून आला. कडावल-बाजारवाडी येथील निर्मला प्रभाकर मोरजकर यांच्या मांगरावर पपईचे झाड पडून ११ हजार ७५०, भडगाव-मलाडवाडी येथील आनंद भगवान लोट यांच्या शेतमांगरावरील पत्रे उडून गेल्याने तसेच लोखंडी अँगल वाकल्याने १ लाख ७४ हजार, पावशी-मिटक्याचीवाडी येथील मधुकर सोमा करंगुटकर यांच्या घरावर माड कोसळून ५० हजारांचे नुकसान झाले. या नुकसानीचे तलाठ्यांनी पंचनामे केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018