शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ट्रकची ताडपत्री फाडून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास, टोळीची लिंक गुजरातपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:23 IST

कुडाळ येथे महामार्गानजीक उभ्या करून ठेवलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देट्रकची ताडपत्री फाडून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपासटोळीची लिंक गुजरातपर्यंत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या; २ मे पर्यंत पोलीस कोठडी

कुडाळ : कुडाळ येथे महामार्गानजीक उभ्या करून ठेवलेल्या ट्रकची ताडपत्री फाडून ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी मुश्ताक अहमद भागलिया (३७, रा. गुजरात) व विनोेद भगवानंद बनिया (४०, रा. नंदुरबार) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरीमागे मोठ्या टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.१ एप्रिल रोजी हा चोरीचा प्रकार घडला होता. ट्रकचालक नवनाथ शिंदे (रा. सातारा) यांनी आपला माल भरलेला ट्रक कुडाळ येथील राज हॉटेलसमोर उभा करून ठेवला होता. या ट्रकमध्ये सीनियर ट्रान्सपोर्टचा माल होता. त्या मध्यरात्री या ट्रकमधील सुमारे ९ लाख ४९ हजार ८३६ रुपयांचा माल चोरीला गेला होता.

चोरीप्रकरणी पोलिसांनी हस्तगत केलेली कार.

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्याजवळ होता. त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने तपास करण्यास सुरुवात केली. या तपासात चोरी झालेल्या ठिकाणच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. तसेच त्यावेळचे मोबाईलचे लोकेशन आणि त्याठिकाणाहून झालेले कॉल डिटेल पडताळण्यात आले.या सगळ्या तांत्रिक तपासामध्ये त्या ठिकाणी वावर असलेल्या के्रटा या गाडीची माहिती घेण्यासाठी पोलीस गुजरातला गेले. त्यावरून या गाडीचे मालक आणि नंतर धागेदोरे सापडत गेले. या प्रकरणात मुश्ताक भागलिया व विनोद बनिया हे दोघेजण सापडले.

तसेच चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला. या दोन्ही गाड्या चोरीवेळी कुडाळ शहरात होत्या असे आढळून आले. दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता २ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.या चोरीचे धागेदोरे थेट गुजरात राज्यात पोहोचले असून यामध्ये काही मोठे व्यापारी असण्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली. अशाप्रकारची चोरी करणाऱ्या टोळ्या गुजरात राज्यात आहेत. या चोरीतील माल कुठे विक्री केला, याचाही तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून काही जण सापडण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस