शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

सिंधुदुर्ग : दूरसंचारचे कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन, महाप्रबंधक क्षीरसागर यांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 7:08 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचारच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या थकीत वेतनाकरिता गुरुवारी सावंतवाडीतील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत दूरसंचारचे महाप्रबंधक एम. एम. क्षीरसागर यांना जाब विचारताच कामगारांचे एका महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.

ठळक मुद्देदूरसंचारचे कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलनमहाप्रबंधक क्षीरसागर यांना विचारला जाब

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दूरसंचारच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या थकीत वेतनाकरिता गुरुवारी सावंतवाडीतील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत दूरसंचारचे महाप्रबंधक एम. एम. क्षीरसागर यांना जाब विचारताच कामगारांचे एका महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तर उर्वरित वेतन २८ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आश्वासन क्षीरसागर यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.जिल्ह्यातील दूरसंचारच्या विभागात कंत्राटी पद्धतीने २३५ कामगार काम करीत आहेत. या कामगारांना संबंधित ठेकेदाराने सहा महिन्यांचे वेतन दिले नसल्याने गुरुवारी सकाळी बीएसएनएल लेबर अँड कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियन आणि भारतीय मजूर संघ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर कामगारांनी येथील दूरसंचार कार्यालयासमोर आंदोलन केले.

कामगारांना वेळच्या वेळी पगार मिळतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी दूरसंचारच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र गेले सहा महिने कामगारांना वेतन मिळाले नसतानाही अधिकारी ठेकेदाराशी आपले हितसंबंध ठेऊन कामगारांवर अन्याय करीत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. ठेकेदार वेतन देण्यास सक्षम नसेल तर कामगारांचे पगार देण्याची जबाबदारी दूरसंचार विभागाची आहे. त्यानुसार त्यांनी कामगारांचे वेतन द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी दूरसंचारच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर ठाकूर, उपाध्यक्ष प्रवीण राजापूरकर, सरचिटणीस वासुदेव जोशी, तालुकाध्यक्ष सुनील दळवी, दीपक समजीसकर, रुपेश चव्हाण, वामन बांबर्डेकर, रमेश चव्हाण, दशरथ कुंभार, निलेश गव्हाणकर, रामचंद्र घाडी, बाळा साटम, आत्माराम पावसकर, प्रियांका वीर, प्रिया पाटील, मिरझरा मलबारी, मोनिका म्हडदळकर, भरत चौकेकर आदी कंत्राटी कामगार उपस्थित होते.

कायदेशीर लढा देणारपाच महिन्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत संबंधित ठेकेदाराला वकिलामार्फत कळविले होते असे क्षीरसागर यांनी सांगितले असता, कामगार कपातीबाबतचा शासनाकडून आलेला जीआर प्रत्यक्षदर्शी दाखविला. मात्र उपस्थित कंत्राटी कामगार संघटनेचे समाधान झाले नाही. त्यामुळे आपण कायदेशीर मार्गाने वरच्या पातळीवर हा विषय लढणार असल्याचे कंत्राटी कामगारांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग