शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तळेरे येथे लक्झरी गाडीसह अवैध दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:08 IST

नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वहातुकीवर कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्यासह लक्झरी बस असा २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देतळेरे येथे लक्झरी गाडीसह अवैध दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाईसाडे बाविस लाखांचा मुद्देमाल जप्त, अडीच लाखांची दारू जप्त

कणकवली : नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वहातुकीवर कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्यासह लक्झरी बस असा २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत परदेशी बनावटीच्या १ हजार मिलीच्या २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या 30 बाटल्या जप्त केल्या आहेत. ही परदेशी बनावटीची दारू ब्रम्हशक्ती ट्रॅव्हल्सच्या खाजगी लक्झरी बस (क्रमांक एमएच 08-इ-9992) मधून केली जात होती . त्यामुळे अवैध दारुच्या बाटल्यासह लक्झरी जप्त केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार आयुक्त डॉ .अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथक आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी यशस्वी कारवाई केली.तळेरे येथे संबधित लक्झरी बस आली असता तीची झडती घेण्यात आली. यावेळी परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्या बसमध्ये आढळून आल्या. या दारू वहातुक प्रकरणी दिगंबर नवनाथ बोडरे ( २९, रा. तोंदले , ता. माण, जि. सातारा ) या आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस.साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, जवान जयसिंग खुटावले, सुहास वरुटे, सुखदेव सिद, मोहन पाटील , दिलीप दांगट, दीपक कापसे, नितीन डेरे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग