शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ओवरलोड वाहतुकीवर तत्काळ कारवाई करा,...अन्यथा उपोषण : महेश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:39 IST

इन्सुली आरटीओ चेक पोस्ट वरून बेकायदा होणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करा. अन्यथा १४ नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी दिला आहे.

ठळक मुद्देओवरलोड वाहतुकीवर तत्काळ कारवाई करा,...अन्यथा १४ नोव्हेंबरला उपोषण : महेश सावंत यांचा ईशारा

सिंधुदुर्ग : इन्सुली आरटीओ चेक पोस्ट वरून बेकायदा ओवरलोड वाहतूक होत असल्याने तेथील ग्रामस्थ व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठिकाणावरूण होणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करा. अन्यथा १४ नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सावंतवाडी तालुक्यातील निगडे तेलीवाडी येथील महेश सावंत यांनी आज सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, झाराप-पत्रादेवी महामार्गावरून इन्सुली चेक पोस्ट समोरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ओवरलोड खनिज वाहतूक भरधाव वेगाने होत आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली असून रस्त्यावरील अपघातातमुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चे लक्ष वेधूनही ओवरलोड बेकायदेशीर वाहतुकीवर निर्बंध आलेला नाही. सदर तक्रारीकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक होत आहे.इन्सुली चेक पोस्ट समोरून होणाऱ्या बेकायदेशीर ओवरलोड वाहतुकीच्या मुद्द्याबाबत तहसीलदार सावंतवाडी यांचे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. सदर बेकायदेशीर ओवरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरची उंची तपासली जात नाही.

ओवरलोड वाहतूक होत असतानाही डंपरना वाहतूक पास देण्यात येत आहेत. त्यामुळे इन्सुली चेक पोस्टसमोर वजनाची मोजमाप करण्यासाठी शासकीय वजन काटा उभारण्यात यावा तसेच सीसीटीव्ही बसवून २४ तास तपासणी पथक तैनात करून ओवरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी