शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:39 IST

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकीय नौका विजयापर्यंत पोहोचेल : सुहास आडिवरेकरसुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर हे अष्टपैलू, अभ्यासू आणि झपाटलेले नेतृत्व आहे. प्रथम नोकरी, त्यानंतर जीवनविद्या मिशन आणि आता त्यांनी भाजपासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करून तिसऱ्या ईनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन प्रमाणे ही देखील बहारदार असेल.

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.जीवनविद्या मिशनचे अनुयायी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे सुपूत्र आणि शिक्षण महर्षी अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया आरोसकर यांनी खार मुंबई येथील अनुयोग प्रशालेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आडिवरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती दादासाहेब परूळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश पारकर, विधानसभा अध्यक्ष गुलाब दुबे, अनुयोग संस्थेचे अध्यक्ष सतीश चिंदरकर, प्रसाद मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत पै, विनायक कारभाटकर, पुण्यातील विभावरी येवले, चंद्रकांत जळगावकर, विक्रम सातारडेकर, अरूण घाडी, विलास देऊलकर, दिनेश आस्वाल आदी उपस्थित होते. पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी सांताक्रूझ येथील संगीत जीवनविद्याच्या टीमने दोन तास आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत धावडे यांनी केले.आरक्षण बाजूला ठेऊन गोरगरिबांना मदत कराउद्योगपती दादासाहेब परूळकर म्हणाले, मी अगदी लहानपणापासून सुभाषला जवळून पाहतोय. तो भाजपमध्ये प्रवेश करून नुसता गप्प बसणार नाही. त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे. भाजपच्या रूपाने आपण लोकांचे चांगले करेन अशी प्रतिज्ञा त्याने करावी. सध्या सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा विषय बाजूला ठेऊन गोरगरिबांची शोध मोहीम राबवून त्यांना मदत करावी. त्यामुळे समाजात वाढत चाललेली दरी कमी होईल. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग