शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : लोकमतच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 17:23 IST

लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी लोकमतच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात पावसाची संततधार असतानाही रक्तदात्यांनी पवित्र दान करून बाबुजींना श्रद्धांजली वाहिली.

ठळक मुद्देस्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीकणकवली जिल्हा कार्यालयात कार्यक्रम

कणकवली : लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी लोकमतच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात पावसाची संततधार असतानाही रक्तदात्यांनी पवित्र दान करून बाबुजींना श्रद्धांजली वाहिली.दरवर्षी लोकमत परिवाराच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यात स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सामाजिक दृष्टीकोनातून सध्या असलेली रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो.

कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, चिरायु आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. तेजस्विनी हर्याण, अधिपरिचारिका डॉ. हेमांगी रणदिवे, वैद्यकीय समाजसेवक किशोर नांदगावकर, लोकमत आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक तसेच लोकमतमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर जिल्हा रक्तपेढीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराला सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत समाजातील विविध स्तरातील लोकांनी आणि लोकमत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष या शिबिरात सहभाग घेतला होता. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सुरू झालेल्या आणि ही बांधिलकी कायम जपणाºया लोकमततर्फे बाबूजींच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचा उपक्रम सातत्यपूर्ण राबविला जात आहे.लोकमत हे राज्यातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक असून सामाजिकदृष्ट्या रक्तदानासारखा पवित्र उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबवित आहे, हे कौतुकास्पद आहे. रक्ताची समाजाला गरज आहे आणि ती भरून काढण्यासाठी लोकमत खारीचा वाटा उचलत आहे, अशा शब्दात समीर नलावडे यांनी गौरवोद्गार काढले.रुपालीचा महिला, विद्यार्थ्यांसाठी आदर्शदेवगड तालुक्यातील साळशी येथील रुपाली अनिल पोकळे या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने साळशी येथून आपल्या वडिलांसमवेत कणकवलीत दुचाकीवरून येऊन रक्तदान केले. ती बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स या विषयात शिक्षण घेतअसून तिला रक्तदान करण्याची इच्छा होती. लोकमतमध्ये रक्तदानाबाबत आलेली बातमी वाचून तिने कणकवलीत येत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच इतर महिला व विद्यार्थ्यांसाठी रक्तदानाबाबतचा आदर्श घालून दिला आहे.रक्तदात्यांचा सहभागरक्तदान करणाऱ्यामध्ये संदीप गावडे, विवेक राणे, लक्ष्मण आडाव, तानाजी आयवाळे, महेश सरनाईक, गिरीश परब, महेंद्र पिळणकर, विशाल सावंत, संजय एकावडे, सतीश धामणकर, दत्तात्रय पाटील, अमित साटम, सिध्देश आचरेकर, रूपेश सुतार, सीताराम गावकर, रूपाली पोकळे, संतोष मराठे, अभिषेक चव्हाण, रूपेश वाळके, सत्यवान कानडे यांनी रक्तदान केले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटBlood Bankरक्तपेढीsindhudurgसिंधुदुर्ग