शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये अपघात, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:55 IST

आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देआंबोलीजवळ सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये अपघाततिघेजण गंभीर जखमी

आंबोली : आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले.आज सकाळी शिवशाही बस (क्रमांक 47८0301 ) ही आंबोलीच्या दिशेने सुसाट येत होती, एका धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला व र्विरुद्ध दिशेने जात चालकाने बस टाटा एस या गाडीवर आदळली. हा अपघात इतका गंभीर होता की टाटा एस या गाडीचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

 

टाटा एस क्रमांक (क्रमांक 09 9120 ) मधील रमेश शिवाप्पा कांबळे (वय तीस, राहणार कसबा हेब्बाळ- गडहिंग्लज), शांताबाई नाईक हे गंभीर जखमी झाले. यात रमेश शिवापा कांबळे यांच्या पायाला व हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मागे बसलेल्या जावेद लबतुरे यांच्याही पायाला दुखापत झाली.

त्याचा सोबत असलेल्या हसीना लांबतुरे हिलाही किरकोळ दुखापती झाल्या अपघाताची भीषणता बघता अपघातात कुणीही वाचले नसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु सुदैवाने या अपघातात कोणीही मृत्यूमुखी पडले नाही.

गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी तसेच गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वास सावंत व दत्त गुरू कलगोंडा करत आहेत.आंबोली मार्गे ही बस पुण्याला नेहमी जात असते,  बस घाट मार्गावरून नेहमी सुसाट असते, अशी इतर वाहन चालकांची तक्रार होती. या बसवरील चालक हे महामंडळाचे प्रशिक्षित चालक नसून ते कॉन्ट्रॅक्टवर रुजू झालेले चालक असल्याने हे चालकनिपूण नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात ओढावत असल्याचा आरोप होत आहे .त्यामुळे या बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत .

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनAccidentअपघात