शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावंत कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:37 IST

माणगाव येथील रमेश सखाराम सावंत यांनी कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसावंत कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्नजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

सिंधुदुर्गनगरी : मालकीच्या जमिनीत चुलत बहिणीने उभारलेल्या इमारतीला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायत, तलाठी, वीज मीटर देणाऱ्या वीज वितरण व इमारतीसाठी कर्ज देणाऱ्या बँकेच्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी वारंवार उपोषणे करूनही प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी झालेली चर्चाही निष्फळ ठरल्याने अखेर माणगाव येथील रमेश सखाराम सावंत यांनी कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.आपल्याला न्याय मिळावा यासाठी सावंत यांनी आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षात आठ ते दहा वेळा उपोषणे केली आहेत. तसेच आत्मदहनापूर्वीचे शेवटचे उपोषण मंत्रालयासमोर केले होते. निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे. याबाबत सबळ पुरावे देऊनही प्रशासन यात कारवाई करीत नाही. केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष व ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी योग्य त्या कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत, असे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.दरम्यान, सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने सावंत कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलाविले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नाराज झालेल्या रमेश सावंत यांचा मुलगा सचिन याने धावत उपोषणस्थळ गाठले. या ठिकाणी आणून ठेवलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न सुरू केला.

यावेळी त्याने सोबत असलेल्या कुटुंबीयांनाही रॉकेल ओतून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी तैनात पोलिसांनी सचिन याच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यासह कुटुंबीयांना पोलीस व्हॅनमधून ओरोस पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.अधिकारीच भ्रष्ट असल्याचा आरोपमाणगाव येथील सचिन सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी सावंत यांना आत्मदहन करण्यापासून अटकाव करताच सावंत यांनी आपल्यावर प्रशासनाने कशाप्रकारे अन्याय केला, असे सांगत टाहो फोडला.

दरम्यान, घटनास्थळी असलेली त्यांची पत्नी, आई व चार वर्षांच्या मुलीने हा सर्व प्रकार पाहून आक्रोश केला. यावेळी सचिन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी या अधिकऱ्यांनी संबंधितांना पाठीशी घातले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्यांना साथ दिली. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी त्यांनाच पाठिंबा देत आहेत असा आरोप करीत कुठे आहेत जिल्ह्यातील आमदार, खासदार व कुठे आहेत पालकमंत्री असा प्रश्न केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा