सिंधुदुर्ग : कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:21 PM2018-07-02T16:21:38+5:302018-07-02T16:23:47+5:30

तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या जंगली सांबराला ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले. वनविभागाने या सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले.

Sindhudurg: Sambhara in the canal alive | सिंधुदुर्ग : कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

तिलारीच्या डाव्या कालव्यात जंगली सांबर पडले होते.

Next
ठळक मुद्देकालव्यात पडलेल्या सांबराला जीवदानसांबराला वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात

सिंधुदुर्ग : तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या जंगली सांबराला ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले. वनविभागाने या सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले.

तिलारीच्या गोवा राज्यात जाणाऱ्या साटेली-भेडशी येथील थोरले भरड येथे कालव्यात जंगली सांबर पडले. यावेळी या मार्गावरून घरी परतत असलेल्या आनंद गवस यांना हे सांबर प्रवाहातून वाहत असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित लगतच्या ग्रामस्थांना माहिती दिली. कोनाळकट्टा वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ग्रामस्थांच्या सहकार्याने सांबराला सुखरूप बाहेर काढले.

यावेळी वनविभागाचे दत्ताराम देसाई व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ शशिकांत गवस, आनंद गवस, भरत गवस, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. जीवदान दिलेल्या सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 

Web Title: Sindhudurg: Sambhara in the canal alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.