शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रिक्षा व्यावसायिकांनी महामार्गाचे काम रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:28 IST

महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून तळेरे, कासार्डे व कणकवली येथील सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कासार्डे येथील के. सी. सी. बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या चौपदरीकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करीत महामार्गाचे काम रोखले.

ठळक मुद्दे रिक्षा व्यावसायिकांनी महामार्गाचे काम रोखलेलवकरच डांबरीकरण करू तळेरे, कासार्डे, कणकवलीतील चालकांना लेखी आश्वासन

तळेरे : महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून तळेरे, कासार्डे व कणकवली येथील सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कासार्डे येथील के. सी. सी. बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या चौपदरीकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करीत महामार्गाचे काम रोखले.

चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग केला असून त्याचे डांबरीकरण न झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येत्या आठ दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा व्यावसायिकांनी आंदोलन मागे घेतले.याबाबत माहिती अशी की, सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग काढलेले आहेत. मात्र, या पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न करता तो फक्त खडी टाकून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.तसेच, अशा पर्यायी मार्गाला कोणतीही पातळी नसल्यामुळे प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या पर्यायी मार्गाचे डांबरीकरण केले पाहिजे, अशी मागणी सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांकडून करण्यात आली. तसेच, आजपर्यंत या रिक्षांच्या काचा फुटल्या त्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात आली.

चौपदरीकरण कामासाठी काढलेले पर्यायी मार्ग हे वळणाचे आहेत. या मार्गांचे योग्य काम न झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पर्यायी मार्गांचे डांबरीकरण करावे. तसेच रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान या कंपनीकडून मिळावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी या कंपनीकडून पर्यायी मार्गाचे ३० मे पूर्वी डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले तर नुकसान भरपाई संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित रिक्षा व्यावसायिकांना कळविण्यात येईल, असे लेखी पत्र या देण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग