शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आठ हजार निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 18:27 IST

मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर सुनावणी घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने बुधवारी सुमारे आठ हजारच्यावर निवेदने देण्यात आली. कुणबी-मराठा समाजाला इतर मागासवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आठ हजार निवेदन सादर  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी : मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर सुनावणी घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने बुधवारी सुमारे आठ हजारच्यावर निवेदने देण्यात आली. कुणबी-मराठा समाजाला इतर मागासवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाची माहिती घेऊन मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाने राज्य मागास आयोगाचे गठन केले आहे. यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आयोगाच्या समितीमार्फत सुनावणी घेण्यात येत आहे. बुधवारी जिल्ह्यात सुनावणी घेण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील विश्रामगृहावर सकाळपासून या समितीमार्फत निवेदने घेण्यास सुरुवात केली होती.

सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची समिती जिल्ह्यात दाखल झाली असून यात सचिव डी. डी. देशमुख, सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, डॉ. सुवर्णा रावळ, राजाभाऊ कर्पे, डॉ. भूषण कार्डिले, संशोधन अधिकारी कैलास ओढे व एन. व्ही. जोशी यांचा समावेश आहे. या समितीने मराठा आरक्षण का मिळावे, ते का गरजेचे आहे याबाबतची निवेदने स्वीकारली.यावेळी सिंधुदुर्ग मराठा समाजाच्यावतीने निवेदने देण्यात आली. या निवेदनात मराठा समाज पूर्वापारपासून कसा मागास राहिला याचे सोदाहरण स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या मराठ्यांची संख्या मोठी आहे. तसेच त्यांनी व्यापारी तत्त्वावर शेती केली नाही. सिंधुदुर्गात मराठा समाजात शैक्षणिक दुरवस्थाही होती. त्याचे मूळ कारण आर्थिक मागासलेपणातच आहे. गरिबीमुळे मराठा समाजाची मुले शिक्षणही घेऊ शकलेली नाहीत. आजही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

जिल्ह्यातील अनेक मराठा पुरुष माणसे ही कामासाठी मुंबई, पुण्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी येथे घरकाम करून उपजीविका करतात. पूर्वापारपासून मराठा व कुणबी यांनी एकत्र काम केले आहे. कुणबी समाजाला इतर मागास वर्गात आरक्षण दिले आहे. आतापर्यंत कुणबी-मराठा अशी जातच इतर मागास प्रवर्गासाठी गृहीत धरली आहे. त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.बुधवारी सकाळपासूनच निवेदने देण्यासाठी सिंधुदुर्गनगरीतील विश्रामगृहावर मराठा समाजाच्या लोकांनी गर्दी केली होती. मराठा महासंघाचे सुरेंद्र पवार, आमदार वैभव नाईक यांच्यासह मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत, प्रभाकर सावंत, सुशांत नाईक, बंड्या सावंत, जयभारत पालव, संजय लाड आदी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.आरक्षण न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा४१९०६ च्या इतिहास दस्तऐवजात मराठा समाज ३.८ टक्के, भंडारी समाज ३.७ टक्के आणि वाणी समाज ११.४ टक्के अशी नोंद आहे. वाणी समाजाची टक्केवारी जास्त असतानाही हा समाज इतर मागास प्रवर्गात मोडतो आणि आरक्षण मिळते. मग मराठा समाजाची टक्केवारी कमी असतानाही या समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्नही या आयोगाला सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. सुहास सावंत यांनी केला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघटना प्रयत्न करीत असताना आपणही शासन स्तरावर प्रयत्न करीत आहोत. मात्र शासन आरक्षण देण्यासंदर्भात कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या हतबल झालो असून १९ फेब्रुवारी २0१९ पूर्वी मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण न मिळाल्यास आपण १९ फेब्रुवारी २0१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कणकवली तालुक्यातील लवू महादेव वारंग यांनी संबंधित आयोग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmarathaमराठा