शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

सिंधुदुर्ग :  दांडीआवार हद्द निश्चितीसाठी न्यायालयात दाद मागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 10:55 IST

मालवण शहरातील दांडी येथील युवकांनी दांडी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय सुरू केला. मात्र मकरेबाग येथील क्रियाशील नसलेल्या मच्छिमारांनी हद्दीवरून छेडलेले आंदोलन चुकीचे आहे. दांडी येथील समुद्रावर आमचाही हक्क आहे. त्यामुळे उपोषणकर्त्या आंदोलकांनी न्यायालयात जाऊन हद्द निश्चित करावी, असे आव्हान देताना दांडी येथील पर्यटन व्यवसायिक न्यायालयीन लढ्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा दिला.

ठळक मुद्देदांडीआवार हद्द निश्चितीसाठी न्यायालयात दाद मागा!पर्यटन व्यावसायिकांचे आव्हान : जलक्रीडामुळे अनेकांचे संसार राहिले उभे

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील दांडी येथील युवकांनी दांडी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय सुरू केला. मात्र मकरेबाग येथील क्रियाशील नसलेल्या मच्छिमारांनी हद्दीवरून छेडलेले आंदोलन चुकीचे आहे. दांडी येथील समुद्रावर आमचाही हक्क आहे. त्यामुळे उपोषणकर्त्या आंदोलकांनी न्यायालयात जाऊन हद्द निश्चित करावी, असे आव्हान देताना दांडी येथील पर्यटन व्यवसायिक न्यायालयीन लढ्यासाठी सज्ज आहोत, असा इशारा दिला.मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर नजीक जलक्रीडा व्यावसायिकांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी अन्वय प्रभू, सतीश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, गौरव प्रभू, आबा पराडकर, राजन परुळेकर, जयदेव लोणे, महेश कोयंडे, निखिल ढोके, कमलेश ढोके, महेश हुरणेकर, बाबू जोशी यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.दांडी आवार येथे सुरू असलेल्या जलक्रीडा व्यवसायात स्थानिक मच्छिमार युवकांची गुंतवणूक आहेत. यातील सर्व व्यावसायिक क्रियाशील मच्छिमार आहेत. पाच वर्षांपूर्वी गावबैठकीत दांडी किनाऱ्यावर जलक्रीडा व्यवसाय करण्याचे ठरविण्यात आले होते. दांडी स्थानिकांनी पर्यटन व्यवसायात पुढाकार घेतल्याने अनेक कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न मिटला.

किनारी भागात जलक्रीडा प्रकार घेत असल्यामुळे याचा मासेमारीवर कोणताही परिणाम होत नाही. गतवर्षीच्या मत्स्योत्पादनातही वाढ झाली होती. क्रियाशील मच्छिमार नसलेले उपोषणास बसून करत असलेला विरोध चुकीचा आहे, असे सतीश आचरेकर यांनी सांगितले.मच्छिमार नेत्यांवर नाराजीमच्छिमार समाजाचे नेते छोटू सावजी, दिलीप घारे व विकी तोरसकर यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना विश्वासात न घेता उपोषणकर्त्या मच्छीमाराना पाठिंबा दिला आहे. मच्छिमार समाजासाठी आम्ही लढलो असताना मच्छिमार नेत्यांनी क्रियाशील नसलेल्या मच्छीमारांना दिल्याने व्यावसायिकांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दांडी किनारपट्टीवर जलक्रीडा सुरू असताना मकरेबाग आवारात जलक्रीडा सुरू असल्याचे भासवून सुरू असलेली दिशाभूल थांबवावी, असे गौरव प्रभू व अन्वय प्रभू यांनी सांगितले.सातबारावर दांडी अशी नोंदउपोषणास बसलेले मच्छिमार हे मकरेबाग परिसरातील आहेत. आमचा जलक्रीडा व्यवसाय दांडी किनारपट्टीवर चालतो. याठिकाणच्या सातबारांवरही दांडी अशी नोंद असल्याचे आबा पराडकर म्हणाले. उपोषणकर्त्यांना हद्द निश्चित करायची असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यासाठी जलक्रीडा व्यावसायिक न्यायालयीन लढ्यासाठी तयार आहोत, असा एकमुखी इशारा व्यावसायिकांनी दिला. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग