शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : राफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल : श्‍वेता शालिनी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र ...

ठळक मुद्देराफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल सिंधुदुर्गात श्‍वेता शालिनी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राफेलबाबतची केंद्र सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच देशाचा चौकीदार प्रामाणिक आहे. पण चुकीची माहिती देऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपच्या राज्य मीडिया सेलच्या प्रमुख व प्रदेश प्रवक्‍ता श्‍वेता शालिनी यांनी येथे केला.राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही काँग्रेसकडून भाजपवर चिखलफेक सुरू आहे. राफेल व्यवहाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांची बाजू मांडण्यासाठी श्‍वेता शालिनी या मंगळवारी सिंधुदुर्गात आल्या होत्या. त्यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, प्रभाकर सावंत, संदेश सावंत- पटेल, प्रज्ञा ढवण, गीतांजली कामत आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी श्‍वेता शालिनी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. यूपीएच्या काळात राफेलचा व्यवहार सुरू झाला होता. पण बोफोर्स हा ज्यांचा इतिहास आहे. ती काँग्रेस या व्यवहारात 10 वर्षे दलालांकडून किती दलाली मिळते त्याची वाट पाहत राहिली. त्यांच्यासाठी देशाची सुरक्षितता महत्त्वाची नव्हती. मात्र, आम्ही देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. त्यामुळेच आमचे सरकार आल्यावर यात कोणताही बदल न करता राफेल खरेदीसाठी पुढाकार घेतला. फक्‍त यातून दलालांना बाजूला करण्यात आले. भारत आणि फ्रान्स सरकारने एकमेकांशी थेट व्यवहार केले. हीच गोष्ट काँग्रेस आणि राहुल गांधी यांना खटकत आहे. म्हणून ते आमच्यावर आरोप करीत आहेत, असे सांगत श्‍वेता शालिनी म्हणाल्या की, न्यायमूर्ती दीपक मिश्रा प्रकारणांमध्ये ज्या न्यायाधीशांची बाजू काँग्रेसने घेतली होती त्याच न्यायाधीशांनी जेव्हा राफेलबाबत केंद्र सरकारला क्लीन चिट दिली तेव्हा राहुल गांधींना तेच न्यायमूर्ती चुकीचे कसे काय वाटू शकतात असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला.केंद्र सरकारला देशाची सुरक्षितता महत्वाची वाटते, त्यामुळे राफेल संदर्भात महत्वाच्या गोपनीय गोष्टी खुल्या न करता हा व्यवहार पारदर्शी झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या व्यवहारावर संशय व्यक्त करून काँग्रेस देशवासीयांचा, वायु सेनेचा अपमान करत आहे मात्र देशाची जनता हुशार आहे, ती योग्य निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.देशात विकासकामे संथ होत आहेत मात्र ती बंद नाहीत. देशाचे शासन बदलले आहे. पण प्रशासन गेली 60 वर्षे तेच आहे .त्याचा हा परिणाम आहे . पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सकारात्मक बदल घडवतील आणि 2019 मध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग