शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  शालार्थ प्रणालीतील गोंधळ कायम, मार्चपर्यंत शिक्षकांचे ऑफलाईन वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 14:55 IST

शालार्थ प्रणालीतील गोंधळ अद्यापी दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन काढावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. आमदार डावखरे यांनी  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देशालार्थ प्रणालीतील गोंधळ कायम, मार्चपर्यंत शिक्षकांचे ऑफलाईन वेतन द्याआमदार निरंजन डावखरे यांची मागणी

सिंधुदुर्ग : शालार्थ प्रणालीतील गोंधळ अद्यापी दूर न झाल्यामुळे, राज्यातील शिक्षकांचे वेतन मार्च 2019 पर्यंत ऑफलाईन काढावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. आमदार डावखरे यांनी  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले आहे.शिक्षकांचे वेतन होणाऱ्या शालार्थ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे राज्य सरकारने जुलै 2018 पर्यंत ऑफलाईन पगाराला परवानगी दिली होती. मात्र, शालार्थ प्रणालीतील बिघाड अद्यापी कायम आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ऑगस्टच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

शाळांच्या मुख्याध्यापकांकडून दरमहा 10 तारखेपर्यंत पगाराची बिले सादर केली जातात. मात्र, या संदर्भात राज्य सरकारचे कोणतेही आदेश नसल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे ऑगस्टचा पगार उशीरा होण्याची भीती होती.

या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना मार्च 2019 पर्यंत शिक्षकांचे ऑफलाईन वेतन काढण्याची मागणी केली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले.शालार्थ प्रणालीमधील बिघाड केव्हा दुरुस्त होईल, अशी विचारणा आमदार डावखरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी किमान आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शाळांची माहिती अपलोड करण्यासाठी जादा कालावधी लागू शकेल. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत ऑफलाईन वेतनाची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्गNiranjan Davkhareनिरंजन डावखरे