शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग : लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या वृत्तांचे प्रदर्शन भरविणार : परशुराम उपरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:14 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांचे प्रदर्शन लवकरच मनसेच्यावतीने जिल्ह्यात भरविण्यात येईल, तसेच संबधित लोकप्रतिनिधिना ते पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे जाहिर केले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या वृतांचे प्रदर्शन भरविणार जनतेत जागृतीसाठी प्रयत्न : परशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या वृत्तांचे प्रदर्शन लवकरच मनसेच्यावतीने जिल्ह्यात भरविण्यात येईल, तसेच संबधित लोकप्रतिनिधिना ते पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे जाहिर केले.येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते. उपरकर पुढे म्हणाले, निवडणूक जवळ आल्यावर आमदार, खासदार यांना आता पुन्हा जनतेची आठवण आली आहे. चार वर्षानी जनतेचा आपल्यालाच कळवळा असल्याचा दिखावूपणा ते करीत आहेत.  आमदार, खासदारांच्या कार्यकालातील चार वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडून जनतेवर पुन्हा आश्वासनांची खैरात करण्यात येत आहे. यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करु न शकलेले हे लोकप्रतिनिधी जनतेची फसवणूक करीत आहेत. खासदारानी मागील निवडणुकीच्या वेळी बीएसएनएल , महामार्ग चौपदरीकरण, रेल्वे संबधी विविध विषय याबाबत आश्वासने दिली होती. त्यातील किती आश्वासनांची पूर्तता केली ? हे जनतेला सांगावे.जिल्ह्यातील आमदार तर आता विविध विषयांसाठी मंत्र्याना भेटून फक्त निवेदने देत आहेत. त्यातील किती प्रश्न सुटले याचा आढावा घेत नाहीत. अथवा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. त्यामुळे ते एकप्रकारे जनतेची फसवणूक करीत आहेत. मच्छिमाराचे प्रश्न सुटल्याचे त्यांनी फक्त भासविले.

संयुक्त गस्ती नौका पाहणी करणार असे सांगितले.  मात्र तसे काहीच झाले नाही. पारंपारिक मच्छिमारांच्या पोटावर पर्ससिननेट धारकानी पाय आणले आहेत. त्याचे कोणालाच सोयर सूतक नाही. आमदार फक्त मंत्र्याना निवेदने देण्यात मशगुल आहेत. त्यामुळे या सर्व आश्वासनांच्या वृत्तांचे प्रदर्शन भरविल्यावर तरी या लोकप्रतिनिधिना आपण दिलेल्या आश्वासनांची जाणीव तरी होईल. असे मनसेला वाटते.सोनुर्ली येथे दगड खाणी असून त्यांच्या चौकशीसाठी अधिकारी गेले असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. याठिकाणांहुन रात्रिचिहि खड़ी वाहतूक केली जाते. त्याचा त्रास जनतेला होत आहे. याविरोधात मनसेने आवाज उठविला आहे. मात्र पालकमंत्र्यांच्या मतदार संघात अशी अनधिकृत कामे होत असताना त्यांचे त्याकडे लक्ष नाही. ते अकार्यक्षम आहेत.

विकास कामांवर निधी खर्च होत असताना कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. तसेच निधी अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे. यावर कोणत्याच लोकप्रतिनिधिचे लक्ष नाही. त्यामुळे आता जनतेलाच याविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. असेही उपरकर यावेळी म्हणाले.अधिकाऱ्यांची मुजोरी वाढतेय !जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जे अधिकारी सेवा बजावत आहेत त्यापैकी अनेकांची मुजोरी वाढत आहे. अनेक अधिकारी गुरुवारीच कार्यालयातून गायब होतात. ते सोमवारी सायंकाळी पुन्हा उगवतात. याकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवाना याबाबत आपण पत्र लिहिले आहे.

कार्यालयातून गायब होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मोबाईल लोकेशन वरुन ते कुठे असतात याची माहिती संकलीत करावी. तसेच दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आपण केली आहे.

अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडताना किंवा बैठका घेताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, तसे होत नाही. फिरतीच्या नावावर अनेक अधिकारी आपल्या मूळ गावी जात असल्याचे आढळून येते. यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे जनतेची कामे प्रलंबित रहात आहेत. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.प्रशासनाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी !राज्यातील 65 टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 35 ते 40 विविध कंपन्या दूध पुरवठा करीत आहेत. त्यांचे नमूने तपासण्याचे काम अन्न व भेसळ प्रशासनाने करणे आवश्यक आहे. येथील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे दूध नमूने तपासण्यासाठी अन्न व भेसळ प्रशासन तसेच जिल्हाधिकाऱ्याना पत्र दिले आहे. जिल्ह्यातील दूध डेअरी बंद पडली असून तिच्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग