शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: January 24, 2024 20:10 IST

Sindhudurg News: सोशल मिडीयावर जी वादग्रस्त पोस्ट फिरत आहे.त्यावरून वेंगुर्ले व सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.ही पोस्ट जिथून व्हायरल झाली त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा जाऊन शोध घेणार आहेत.

सावंतवाडी - सोशल मिडीयावर जी वादग्रस्त पोस्ट फिरत आहे.त्यावरून वेंगुर्ले व सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.ही पोस्ट जिथून व्हायरल झाली त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा जाऊन शोध घेणार आहेत. तसेच यातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सिंधुदुर्ग चे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सर्वानी शांतता राखावी सिंधुदुर्ग चा सायबर सेल 24 तास काम करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. व्हायरल पोस्ट वरून घडलेल्या प्रकारानंतर बुधवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली.व परस्थीतीचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले, सावंतवाडी व वेंगुर्ले पोलिस ठाण्यात व्हायरल पोस्ट वरून गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात काही आरोपींना अटक ही करण्यात आली असून पोलिस योग्य तो तपास करतील असे स्पष्ट केले.तसेच या वादग्रस्त व्हायरल पोस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात ही गुन्हे दाखल झाले  असल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले.असून या प्रकरणातील मुख्य सुत्रधारा पर्यत पोलिस नक्कीच पोचतील सायबर सेल पूर्ण पणे यामागे लागला असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा त्यातून कोणताही चुकीचा संदेश व्हायरल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे चुकीच्या संदेशामुळे दोन समाज्यात तेढ  निर्माण होणार नाही हे बघितले पाहिजे असे ही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

महाविद्यालयात पुन्हा एकदा सायबर जनजागृती मोहीम हा सर्व प्रकार महाविद्यालयीन मुलाच्या हातून घडत आहे.असेच तपातून दिसून येत आहे.त्यामुळे गरज भासल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.असेही अधीक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले.

व्हायरल पोस्ट च्या मुळाशी जाणार वादग्रस्त व्हायरल पोस्ट वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे या वादग्रस्त व्हायरल पोस्ट च्या मुळाशी पोलिस जाऊन तपास करतील आणि दोषींना अटक करतील असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस