शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 16:32 IST

निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्याकडे छापे टाकणाऱ्या स्पेशल छब्बीस या बोगस अधिकारी पथकाला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मदत केल्याचे झालेल्या चौकशीत उघड झाले आहे.

ठळक मुद्देसायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक निलंबितनिरूखेतील दरोडा प्रकरण आठ पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी

सिंधुदुर्गनगरी : निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्याकडे छापे टाकणाऱ्या स्पेशल छब्बीस या बोगस अधिकारी पथकाला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मदत केल्याचे झालेल्या चौकशीत उघड झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यालयातील सायबर सेल शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांना निलंबित केले आहे, तर उर्वरित आठ पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे .कुडाळ येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या निरूखे येथील निवासस्थानी केंद्रीय आयकर अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांसमवेत त्या बोगस पथकाने छापे टाकून सुमारे साडेसात लाखांचा दरोडा घातला होता. हा दरोडा सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाच्या डोळ््यादेखत घातला होता.

ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती. यात करंदीकर यांना अवैध रक्कम, डिझेल व पेट्रोलचा साठा करणे या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

बनावट अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने घराची झाडाझडती घेतल्यानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिसांना रोख १,८५,७१० रुपये दाखविण्यासाठी दिले. त्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करा असे सांगत तिथून उर्वरित सुमारे साडेपाच लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.यानंतर खऱ्या पोलिसांनी करंदीकर यांच्या घराबाहेरील पेट्रोल व डिझेलची कॅन व ही कॅन ठेवलेली महिंद्रा पीक अप यांचा पंचनामा करून करंदीकर यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.२३ एप्रिल रोजी करंदीकर हे जामिनावर सुटल्यावर पंचनाम्यात सुमारे साडेपाच लाख रुपये एवढी रक्कम दाखविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अवाक् झालेल्या करंदीकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत चौकशी करण्याची मागणी केली.यानुसार पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी चौकशी केली असता हा छापा नसून बनावट अधिकारी बनून आलेल्या टोळीने पोलिसांना फसवून घातलेला दरोडा असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने करंदीकर यांना खर्चासाठी कपाटात ४४ हजार रुपये ठेवले होते हे चौकशीत निष्पन्न झाले.पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखलजिल्हा पोलीस विभागात खळबळ माजवून पोलिसांची झोप उडविली आहे. या प्रकरणात भामट्यांना सहाय्य केलेल्या पोलिसांची चौकशी झाली असून सायबर सेल शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी निलंबन केले आहे. तर अन्य आठ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस विभागाचे नाक कापणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून राज्यभर खळबळ माजवलेल्या या दरोड्यातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस