शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधी खाकी, मग बाकी; निवडणुकीमुळे पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 28, 2024 18:04 IST

अनेक अधिकारी, कर्मचारी देताहेत अहोरात्र सेवा

सिंधुदुर्ग : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर यंदाची सिंधुदुर्गपोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे. पोलिसांच्या रजा, सुट्ट्या २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंबप्रमुखाशिवाय सण साजरा करावा लागणार, असे चित्र दिसते. विशेष म्हणजे जिल्ह्याबाहेरील बहुतांश पोलिस अधिकारी महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यात सेवा देत आहेत.लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. त्यानंतर थोड्या दिवसांची विश्रांती मिळाली. पुन्हा गणेशोत्सवात पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्तही झाला. विधानसभा निवडणुकीची लगबग ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात जवळपास चार हजारांहून अधिक पोलिस, होमगार्डस, राज्य राखील दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त राहणार आहे.सणासुदीच्या काळात कुटुंबियांपासून दूरचनिवडणूक म्हटली की, उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस सज्ज रहावे लागते. यंदा तर दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक दोन्हींकडे पोलिस यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका म्हटले की पोलिसांच्या रजा आणि सुट्ट्या बंद होतात. त्यानुसार यंदाही पोलिसांना सणासुदीच्या काळात कुटुंबियांकडे लक्ष देता येणार नाही.

साप्ताहिक सुट्ट्या, रजा रद्दपोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणासाठीच्या रजा घेता येणार आहेत.

निकालानंतरच जाणार स्वगावीजिल्ह्याबाहेरील रहिवासी असलेले बहुतांश पोलिस अधिकारी लक्ष्मीपूजन कर्तव्याच्या ठिकाणी दरवर्षी करतात. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी चार ते पाच दिवसांच्या रजा काढून दूरवरील स्वगावी जातात. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीमुळे रजा मिळणार नाही.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा आहे. नजिकच्या गोवा राज्यातून महाराष्ट्रातील विविध भागात अवैध दारूची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे सीमेवरील सर्व तपासणी नाके आणि अंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांवर पोलिसांचा कडक पहारा असून विविध टीमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. माझे पोलिस बांधव अहोरात्र सेवा देणार असून ‘आधी खाकी मग बाकी’ म्हणत कर्तव्य बजावणार आहेत. - सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Diwaliदिवाळी 2024