शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शेर्ले येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 13:08 IST

निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवित गाडीवर ताबा मिळविल्याने व प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशेर्ले येथे एसटी बस गटारात कलंडून अपघातनिगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे अपघात

बांदा : निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवित गाडीवर ताबा मिळविल्याने व प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. निगुडे येथे जाणारा रस्ता हा खूपच अरुंद आहे.याविषयी माहिती अशी की, निगुडे, शेर्ले, रोणापाल व मडुरा भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी निगुडेमार्गे मडुरा जाणारी ही सावंतवाडी एसटी स्थानकातून सकाळी ६ वाजता सुटते. सकाळी ६ च्या दरम्याने निगुडे रस्त्यावर शेर्ले घाणा येथे ही बस आली असता वेगाने येणाºया दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. हा अपघात मंगळवारी सकाळी ७ च्या दरम्यान घडला.या अपघातामुळे बसफेरी अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी पायपीट करून बांदा गाठले. यावेळी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे सफाईची मोहीम तत्काळ हाती न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.महिन्याभरातील दुसरी घटना, रस्ता धोकादायकपंधरा दिवसांपूर्वीच तेलीवाडी येथील अंकुश राणे यांच्या घराशेजारी धोकादायक वळणावर दुचाकीला बाजू देताना एसटीला अपघात झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीनच धोकादायक बनला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग