शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता : अतुल काळसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:25 IST

नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सर्वांना तडीपार करा अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देपारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता : अतुल काळसेकर समीर नलावडेंना तडीपार कराभाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी : कणकवली कॉलेज परिसरात झालेली मारहाण व त्यानंतर संदेश पारकर यांच्या घरावर झालेला हल्ला या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. यावरून पारकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता असे दिसून येते. त्यामुळे पारकर यांना पोलीस संरक्षण द्यावे.

या घटनेत सहभागी असलेल्या नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून सर्वांना तडीपार करा अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कणकवली येथे ५ डिसेंबर रोजी भाजपा व स्वाभिमान पक्षातील कार्यकर्ते भिडले होते. परिणामी गाड्यांची तोडफोड करून वातावरण तंग झाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, संदेश पारकर, राजू राऊळ, राजन वराडकर, संदेश पटेल, अवधूत मालणकर उपस्थित होते.अधीक्षकांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काळसेकर म्हणाले, बुधवारी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ मारामारी झाली. यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य जणांनी संदेश पारकर यांच्या घरावर हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड केली.

सुदैवाने संदेश पारकर व त्यांचे कुटुंबीय घरात नसल्याने जीवावर बेतणारा प्रसंग घडला नाही. दुर्दैव म्हणजे नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून दहशत निर्माण करत होते. पोलिसांसमोर देखील त्याच आवेशात फिरत होते. यामुळे या घटनेचा परिणामही कणकवलीतील नागरिकांच्या मनोधैर्यावर झाला आहे.ते आमचे कार्यकर्ते नाहीतकॉलेज परिसरात झालेल्या मारामारीचा भाजपाशी काडीचाही संबंध नाही. कॉलेज युवकांना मारहाण करणारे तरूण हे भाजप पक्षाशी निगडीत नसल्याचे अतुल काळसेकर यांनी अधीक्षक गेडाम यांना सांगितले. तर या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन गेडाम यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :Atul Kalasekarअतुल काळसेकरsindhudurgसिंधुदुर्ग