शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग  : पाळये, घोटगेवाडीत हत्तींचा थरार, ग्रामस्थांनी ढोल वाजवत वन्य प्राण्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगावर अधूनमधून धावून जाणारा हत्तींचा कळप असा थरार सोमवारी रात्रभर सुरू होता.

ठळक मुद्देतिलारी खोऱ्यात पाळये, घोटगेवाडीत हत्तींचा थरार ग्रामस्थांनी ढोल वाजवत वन्य प्राण्यांना पिटाळले

दोडामार्ग : गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगावर अधूनमधून धावून जाणारा हत्तींचा कळप असा थरार सोमवारी रात्रभर सुरू होता.तिलारी खोऱ्यात गेल्या वर्षभरापासून नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचा कळप दोन दिवसांपासून घोटगेवाडी व पाळये येथे ठाण मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

वनविभाग हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ व शेतकरी रात्रीच्यावेळी हत्तींना पिटाळण्यासाठी गस्त घालत आहेत. सोमवारी रात्री दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हत्तींना तिलारीच्या जलाशयातून पिटाळण्यात ग्रामस्थांना यश आले.तिलारीतून पाळये व तेथून पुढे घोटगेवाडी असा हत्तींचा नेहमीचा प्रवास असल्याने पाळयेतील ग्रामस्थ शिवराम गवस, संदेश वरक, लिंंगाजी गवस, गोपाळ पंडित, देवजी सावंत, विनायक सावंत, वैभव गवस, मायकल लोबो, वनकर्मचारी लोकरे यांनी पाळये गावाच्या सीमेवर, तर घोटगेवाडीच्या सीमेवर उपसरपंच भालचंद्र कुडव, संतोष दळवी, सिध्दार्थ चव्हाण, गुरूदास दळवी, कमलेश पर्येकर, अतुल कर्पे, परेश धुरी आदी ग्रामस्थांनी जोरजोराने ढोल वाजविण्यास सुरूवात केली.

त्यामुळे बिथरलेल्या तीन हत्तींच्या कळपाने ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाण्यास सुरूवात केली. बराच वेळ हा थरार सुरू होता. अखेर शेतकरी आणि हत्ती यांच्या या संघर्षात शेतकऱ्यांचा विजय झाला. मात्र पुन्हा हत्ती या भागात परतण्याची शक्यता असल्याने हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल