शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :उर्दू शिक्षक मिळत नसल्याने पालकांचे शाळा बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:20 IST

मागणी करूनही शिक्षण विभागाकडून मालवण तालुक्यातील आचरा उर्दू शाळेला मंजूर कोठ्याप्रमाणे शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे शुक्रवारी आचरा उर्दु शाळा मुलाविनाच सुरू झाली होती.

ठळक मुद्देउर्दू शिक्षक मिळत नसल्याने पालकांचे शाळा बंद आंदोलनमागणीला शिक्षण विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता

सिंधुदुर्ग : मागणी करूनही शिक्षण विभागाकडून मालवण तालुक्यातील आचरा उर्दू शाळेला मंजूर कोठ्याप्रमाणे शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे शुक्रवारी आचरा उर्दु शाळा मुलाविनाच सुरू झाली होती.यावेळी पालकांच्या झालेल्या बैठकीत जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे निक्षून सांगत शासनाला आवश्यक शिक्षक देता येत नसतील तर शाळा खासगी करण्यासाठी परवानगी द्या आम्ही चालविण्यास सक्षम असल्याचे उपस्थित पालकांमधून सांगण्यात आले.यावेळी रियाज काझी, अस्मा मुजावर, जाफर काझी, नजमुद्दीन शेख, अश्फाक मुजावर, रियान काझी, जफरूल्ला काझी, नबिला काझी, उज्मा मुजावर, अन्शा मुजावर, समिना काझी, शहनाज अन्सारी, तब्बस्सूम मुजावर, आलम अन्सारी, शबाना मुजावर, रशिद काझी, मनवर शहा यांसह अन्य पालक आदी उपस्थित होते.बेचाळीस पटसंख्या आणि इयत्ता आठवी पर्यंत वर्ग असलेल्या आचरा येथील मंजूर चार शिक्षकांपैकी केवळ दोनच शिक्षक येथे कार्यरत आहेत. यापैकी एका शिक्षकाला अधून-मधून कामगिरीवर काढत असल्याने बेचाळीस मुलांची जबाबदारी केवळ एकाच शिक्षकावर येते.याबाबत येथील पालकांनी गेल्या महिनाभरापासून पटसंख्येचा विचार करून या शाळेसाठी आवश्यक ते शिक्षक देण्याची मागणी केली होती. पण पालकांच्या मागणीला शिक्षण विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.

त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी सात डिसेंबर पासून जो पर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे शुक्रवारी शाळा उघडली होती पण शाळेत मुलेच नाहीत अशी स्थिती होती.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्ग