शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सिंधुदुर्ग : अन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 5:14 PM

आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन.असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.

ठळक मुद्देअन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार  प्रमोद जठार यांचे प्रतिपादन

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदार संघातून भाजपकडून संदेश पारकर यानाच उमेदवारी द्यावी.अशी मागणी पक्षाजवळ मी केली आहे. पारकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार असल्याचेही सांगितले आहे. यानिमित्ताने आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेट्ये, समर्थ राणे उपस्थित होते. प्रमोद जठार पुढे म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीबाबत नगरविकास मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपची चिंतन बैठक झाली.

यावेळी निवडणुकी दरम्यान झालेल्या चुका, त्रुटी दूर करून जोमाने ' कमबॅक' करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यानी केला. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मंत्री रविंद्र चव्हाण यांना मी विनंती केली की, संदेश पारकर यांनाच कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने उमेदवारी देण्यात यावी.

ही विनंती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मान्य केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बोलतो असे सांगितले आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली- वैभववाडी- देवगड या विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी संदेश पारकर यांची नियुक्ती त्यांनी केली आहे. तसेच त्याना काम करण्यास सांगितले आहे.कणकवली विधानसभा निवडणुकीत माझा 34 मतानी ज्यावेळी विजय झाला होता.त्यावेळी अपघाताने झालेला आमदार असे मला विरोधक संबोधत होते. मात्र असे संबोधणारे नेते आता स्वाभिमान मध्ये असून या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार माधुरी गायकवाड़ यांचा विश्वासघात करून अवघ्या 37 मतानी नगराध्यक्ष निवडून आणला आहे. याचा विचार करावा, असे विश्वासघातकी राजकारण करण्यापेक्षा आम्हाला कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून सन्मानपूर्वक झालेला कणकवली नगराध्यक्ष पद निवडणुकीतील पराभव मान्य आहे.भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याना या पराभवाचा बदला घ्यायचा असेल तर 2019 मध्ये भाजपचाच आमदार कणकवली विधानसभा मतदार संघात निवडून येईल यासाठी आतापासूनच त्यानी कामाला लागावे. असे माझे त्याना सांगणे आहे.नेत्यांच्या भूल थापाना बळी पडू नका !नाणार येथील शासकीय रिफायनरी प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकांना पेट्रोल तसेच डिझेल सारख्या पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी खासगी उत्पादकांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे या खासगी उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.

त्यासाठीच या खासगी लोकांनी दिलेली सुपारी घेवुन विनायक राऊत तसेच नारायण राणे यांच्यासारखे नेते या प्रकल्पाच्या विरोधात आदळ आपट करीत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून बेरोजगाराना रोजगार मिळाला तर या विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला कार्यकर्तेच मिळणार नाहीत. त्यामुळेच हे नेते विरोधाचे राजकारण करीत आहेत.हा प्रकल्प झाल्यास कोकणातील लोक समृध्द होतील , त्याना पैसे मिळतील त्यामुळे हे लोक धास्तावले आहेत. त्यासाठी कोकणातील लोकांना आमचे आवाहन आहे की, या नेत्यांच्या भूलथापाना बळी पडू नका. तुम्ही स्वतः या प्रकल्पा बाबतची सत्य माहिती समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.असे ही प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.किंग अथवा किंगमेकर आम्हाला नको !आम्हाला 'किंग' अथवा 'किंग मेकर 'नको आहेत. सच्चे लोकप्रतिनिधी हवे आहेत. फक्त स्वतःचाच विकास करून स्वतःच्याच मालमत्तेत भर घालणारे लोकप्रतिनिधी नको आहेत. त्यामुळे कणकवलीतील जनतेने आता सावध रहावे. कारण नगरपंचायतीच्या सत्तेत 'किंग' आणि 'किंगमेकर 'आलेले आहेत. शिवसेना - भाजपच्या सहाही नगरसेवकांनी डोळ्यात तेल घालून कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर अंकुश ठेवावा.असेही प्रमोद जठार यांनी यावेळी आवाहन केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण