शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात शिवसेनेच्यावतीने  महाआरती- ठिकठिकाणी  रॅली-वैभव नाईक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:55 IST

कणकवली : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्यादृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या माध्यमातून   हिंदुच्या ...

कणकवली : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्याच्यादृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या माध्यमातून   हिंदुच्या अस्तित्वाचा देशव्यापी मुद्दा हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्देत दाखल होणार आहेत. त्यादिवशी साधुसंताच्या विविध आखाडयांना भेट देवुन  शरयू  नदीकिनारी श्रीरामाची महाआरती ते  करणार आहेत. यापार्श्वभुमीवर सिंधुदुर्गात रॅली द्वारे विविध मंदिरांमध्ये शिवसैनिक व तमाम हिंदु बांधव श्रीरामाची महाआरती करणार असल्याची माहीती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली.

          कणकवली येथील विजय भवन येथे बुधवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर उपस्थित होते.   अरुण दुधवडकर म्हणाले ,  उद्धव ठाकरे यांच्यासोबत  सिंधुदुर्गातुन फक्त प्रमुख पदाधिकारी अयोध्या येथे जाणार आहेत. युवासेना, महिलाआघाडी व जेष्ठ शिवसैनिक या दौऱ्यासाठी जाणार नाहीत. प्रभु श्रीराम यांचे मंदिर उभारण्यासाठी हा शिवसेनेचा महत्वपुर्ण दौरा असल्याने देशातील शिवसैनिक अयोध्देला जाणार आहेत.      आमदार  वैभव नाईक म्हणाले,  सिंधुदुर्गात  कणकवलीसह आठही तालुक्यात  प्रभुश्रीरामाची महाआरती शिवसैनिक व हिंदु बांधव 24 नोव्हेंबर रोजी करतील. ठिकठिकाणी रॅली  काढुन अयोध्देतील प्रभु श्रीरामाच्या मंदिर उभारण्यासाठी समर्थन देण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्देला गेल्यानंतर २५ नोव्हेंबरला श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे जाहीर सभाही होणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.   तसेच  सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या रॅली व महाआरतीमध्ये शिवसैनिकांबरोबर हिंदूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही  यावेळी त्यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर