शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री !. उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:30 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री ! परशुराम उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत. दिपक केसरकर हे पालकमंत्री नसून घोषणा मंत्री झाले असल्याची टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यानी जिल्ह्याच्या विकासाची वाट लावली आहे. पाहुणे असल्यासारखे ते जिल्ह्यात येतात आणि सावंतवाड़ी पुरते मर्यादित रहातात. त्यामुळे ते फक्त सावंतवाड़ी तालुक्याचे पालकमंत्री बनले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील जनतेबाबत त्याना काही देणे घेणे नाही.दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणेबाबत माहितीच्या अधिकारात त्यांच्या कार्यालया जवळ माहिती मागितल्यास संबधित कार्यालया कडून ती उपलब्ध करून घ्या असे सांगितले जाते. याला काय म्हणायचे ?एखाद्या योजनेबद्दल माहिती जाहिर करायची. मात्र, त्या योजनेसाठी निधी वितरित झाला किंवा नाही याची माहिती घ्यायची नाही असे सध्या त्यांचे चालले आहे. त्यांच्या मतदार संघात चोऱ्या, दरोडे , अवैध उत्खनन सुरु आहे. जनतेकडून अर्ध नग्न स्थितीत उपोषण करण्यासारखे मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र, त्याचे त्यांना काहीच नाही.जिल्ह्याच्या विकासासाठी 2700 कोटींचा निधी आणला, फ़ूड पार्क उभारणार , चांदा ते बांदा योजना अंतर्गत विविध विकास कामे करणार , मुख्यालय विकासासाठी 25 कोटींचा निधी आणला , तिलारी पाईप लाईन साठी निधी 100 कोटींचा निधी दिला अशा अनेक घोषणा पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.

यापैकी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध झाला ? याची काहीच माहिती त्यांच्या जवळ अथवा त्यांच्या कार्यालया जवळ नाही. त्यामुळे त्याना जर परिपूर्ण माहिती देता येत नसेल तर फक्त श्रेय घेण्यासाठी घोषणा करून जनतेची फसवणूक करु नये.त्याचबरोबर अशा फसव्य घोषणा करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही जागरूक लोकप्रतिनिधी आहेत. ते जनतेच्या हितासाठी विविध विषयांची माहिती घेत असतात आणि ती जनतेपुढे मांडत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यानी नेमका कोणता विकास केला ते जनतेसमोर जाहिर करावे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.सर्वच पालकमंत्री फसवणूक करणारे !दीपक केसरकर यांच्या पूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणारेही जनतेची फसवणूक करणारेच होते. सावंतवाड़ी तहसील कार्यालयाच्या कामाची निविदा आठ वर्षापुर्वी काढण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री कोण होते? याची माहिती स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि त्यानंतर आंदोलन करावे.

चीपी विमानतळाच्या कामाचे तिन वेळा उदघाट्न नारायण राणे यानी केले आहे. तरीही या विमानतळावरुन विमान अद्याप उड्डाण करु शकलेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचे सर्वच पालकमंत्री जनतेची फसवणूक करणारे होते.असे स्पष्ट होत असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग