शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:12 IST

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे निरंजन डावखरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणारकोकण भवनमध्ये हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित

सिंधुदुर्ग : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या वतीने माजी आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांचा गुरुवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजप-रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या मित्र पक्षांच्या लोकप्रतिनिधींबरोबरच हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अ‍ॅड. निरंजन डावखरे करीत होते. गेल्या सहा वर्षांच्या काळात त्यांनी कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच पदवीधर मतदारांचे प्रश्न मांडले होते. त्यातील अनेक प्रश्न सुटले असून, काही मार्गी लागत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अ‍ॅड. डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डावखरे यांचे स्वागत केले. तसेच त्यांची विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिफारस केली होती.

गेल्या दहा -बारा दिवसांपासून माजी आमदार अ‍ॅड. डावखरे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांना कार्यकर्त्यांबरोबरच पदवीधर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याकडून गुरुवारी (ता. 7) सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणElectionनिवडणूक