शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
4
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
7
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
8
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
9
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
10
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
11
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
12
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
13
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
14
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
15
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
16
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
17
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
18
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
19
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
20
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नाणार प्रकल्प उभा रहावा : बबन साळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:31 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण नाही. हे पानीपत येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांमुळे समोर आले आहे. त्यामुळे नाणार येथे होणारा हा प्रकल्प उभा रहावा, या मताचा मी असून पानीपत येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प पाहण्याची माझी इच्छा आहे, असे स्पष्ट मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प उभा रहावा : बबन साळगावकर पानीपत रिफायनरी पाहण्याची आपली इच्छासावंतवाडी नगराध्यक्षांनी मांडले सडेतोड विचार

सिंधुदुर्ग : ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोणतेही प्रदुषण नाही. हे पानीपत येथे अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रयांमुळे समोर आले आहे. त्यामुळे नाणार येथे होणारा हा प्रकल्प उभा रहावा, या मताचा मी असून पानीपत येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प पाहण्याची माझी इच्छा आहे, असे स्पष्ट मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.नगराध्यक्ष साळगावकर यांनी सावंतवाडी पालिकेमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर उपस्थित होत्या. यावेळी साळगावकर म्हणाले, या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होणे काळाची गरज आहे.

प्रकल्प एकाने आणायचा व दुसऱ्याने त्याला विरोध करायचा ही राजकीय प्रवृत्ती चुकीची आहे. इतर देशातील टॅलेंट याठिकाणी वापरले असते तर आज कोकण विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर दिसले असते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. मात्र आत्तापर्यंतच्या एकाही राजकीय नेत्याला येथील एकही बंदर विकसित करता आले नाही हे आपले दुर्दैव आहे.आशिया खंडातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आपण या ठिकाणावरून घालवतो हे सर्वात मोठे दुर्दैव असून नाणारसारखा प्रकल्प यशस्वी होणे गरजेचे आहे. काही लोकांनी पत्रकारांसहित पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाची पाहणी केली. तेथील लोकांकडून या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यातून ग्रीन रिफायनरी मधून निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही हे समोर आले.विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. सीवर्ल्ड, गोल्फ क्लब सारखे प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. येथील युवक-युवतींना रोजगार मिळावा आईवडीलांच्या म्हातारपणात तेच त्यांच्या जीवनाची काठी बनावेत हा त्या मागचा उद्देश आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.विकास परिषद बोलावणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने कोणता मोठा प्रकल्प नाही. आज अनेक तरुण बेरोजगार आहेत. या ठिकाणी आलेल्या प्रकल्पाला विरोध होतो यामागचे नेमके कारण काय या संदर्भात सगळ्याच राजकीय लोकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण लवकरच विकास परिषद आयोजित करणार असल्याचे साळगावकर म्हणाले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग