शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : गतिरोधकाच्या सळ्या धोकादायक, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:18 IST

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे फाटकानजीक रेल्वेने घातलेल्या गतिरोधकाच्या सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. त्यामुळे तळेरेकडे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला असून सळ्या टायरमध्ये घुसून रात्रीच्या वेळी भीषण दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्दे गतिरोधकाच्या सळ्या धोकादायक, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष कोकिसरे फाटकावरील स्थिती

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे फाटकानजीक रेल्वेने घातलेल्या गतिरोधकाच्या सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. त्यामुळे तळेरेकडे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला असून सळ्या टायरमध्ये घुसून रात्रीच्या वेळी भीषण दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु गतिरोधकाच्या बाजूलाच रेल्वेची केबीन असूनही गतिरोधकाच्या परिस्थितीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.रेल्वे फाटकामुळे वाहनचालक व प्रवासी पुरते त्रस्त झालेले आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर फाटकाच्या दुतर्फा रेल्वेमार्फत सिमेंटचे स्लीपर टाकून मोठे गतिरोधक तयार करण्यात आले आहेत.या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने अलिशान कार व तत्सम चारचाकी छोट्या वाहनांचे गतिरोधकाशी घर्षण होऊन आर्थिक नुकसान होत आहे. तर गतिरोधकाच्या उंचीमुळे काही वाहनांना अपघात होऊन रेल्वेचे फाटक तुटण्याच्या घटना घडल्या आहेत.रिक्षा, दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना गतिरोधकाच्या टोकदार सळ्यांचा सर्वाधिक धोका आहे. रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

भीषण अपघाताची भीतीवैभववाडीकडील गतिरोधकाचे काही स्लीपर वाहनांच्या दणक्याने उखडून त्यांची झीज झाल्यामुळे सळ्यांची टोके उघडी पडली आहेत. सतत बंद होणाऱ्या फाटकावर वाहनचालकांचे लक्ष असल्याने ही उघडी पडलेली गतिरोधकावरील सळ्यांची टोके सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या टायरमध्ये सळ्या घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फाटक उघडे असताना या गतिरोधकावर वाहनांचा वेग किंचित कमी होत असला तरी फाटक पार करुन जाण्याची घाई असते. रात्रीच्यावेळी या सळ्या दिसत नाहीत. त्यामुळे घाईगडबडीत फाटक पार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहनांना उघड्या पडलेल्या सळ्या टायरमध्ये घुसून भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :railwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग