शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सिंधुदुर्गनगरी : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळाव्यास उदंड प्रतिसाद , राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 14:46 IST

सिग्मा करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे वर्दे येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व मेळाव्यामध्ये राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवारांनी सहभाग घेतल्याने मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेश देण्यात आला.

ठळक मुद्देपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळाव्यास राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवार सहभागी मेळाव्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यांसह राज्यभरातून उमेदवारमैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेशसंघर्ष करा, संधीचे सोने करा : कोळी

सिंधुदुर्गनगरी : सिग्मा करिअर अ‍ॅकॅडमीतर्फे वर्दे येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व मेळाव्यामध्ये राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवारांनी सहभाग घेतल्याने मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमेदवारांना मोफत प्रवेश देण्यात आला.सिग्मा अ‍ॅकॅडमीमार्फत मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडे आठ वाजता मेळाव्याचा शुभारंभ वेंगुर्ले पोलीस निरीक्षक एस. बी. कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मैदानी परीक्षा घेण्यात आली. यात गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स, १००, १६०० व ८०० मीटर धावणे प्रकार घेण्यात आले. त्यानंतर लेखी व मैदानी परीक्षेचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला.यात प्रथम आलेल्या तेरा उमेदवारांना सिग्मा अ‍ॅकॅडमीमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला. यामध्ये आफान शेख, दर्शन भालेकर, सागर गावडे, बाबू घाडीगावकर, सविता कलिंगणे, ऋतुजा सावंत, दर्शना गावकर, अपर्णा भोसले, अदिती पुजारे, प्रथमेश जळवी, अभिजीत जळवी, जगन्नाथ वेळकर, एकनाथ गुरव यांचा समावेश आहे. या मेळाव्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यांसह राज्यभरातून उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.संघर्ष करा, संधीचे सोने करा : कोळीउपस्थित यशस्वी उमेदवारांचे सिग्माच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिग्माचे संचालक एस. जी. ठाकुर, एस. व्ही. भोगले, प्राचार्य एस. जे. लोखंडे, प्राध्यापिका सविता ओटवणेकर, जी. एस. कांबळे, पी .व्ही. खरात, एच. पी. आजगावकर, व्यवस्थापक जे. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक कोळी यांनी उपस्थित उमेदवारांना संघर्ष करा, प्रत्येक संधीचे सोने करा अशा शब्दात मार्गदर्शन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpolice parade groundपोलिस कवायत मैदान