शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

सिंधुदुर्ग : स्वाभिमान पक्षाचे बांदा येथे मुंडण आंदोलन, जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:17 IST

गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देस्वाभिमान पक्षाचे बांदा येथे मुंडण आंदोलनजिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने

बांदा : गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला. 

गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. येथील रुग्णसेवा ही पूर्णपणे गोवा राज्यावर अवलंबून असूनही रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत.

याला सर्वस्वी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींचा तसेच विनामूल्य सेवा देण्यास नकार देणारे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर आरोप करीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला.

यावेळी लोकप्रतिनिधींच्या निषेधाच्या घोषणा देत सामूहिक श्राद्धदेखील घालण्यात आले. बांदा पोलिसांनी ३२ आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसेवेचा प्रश्न हा गंभीर असून लोकप्रतिनिधी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. गोव्याने रुग्णशुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात सर्वप्रथम जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले.

हे आंदोलन सलग दहा दिवस सुरू आहे. त्यानंतर सावंतवाडी, कुडाळ येथेही आंदोलन करण्यात आले आहे. मात्र राज्यशासनाला जाग येत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब व उपसरपंच अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली अनोखे मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.गुरुवारी दुपारी १२ वाजता बांदा येथील कट्टा कॉर्नर चौकात बांद्याचे उपसरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य श्याम मांजरेकर, स्वाभिमान पक्षाचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ सावंत यांनी मुंडण करीत पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा जाहीर निषेध केला. तसेच यावेळी सामूहिक श्राद्धदेखील घालण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समितीचे सभापती रवींद्र मडगावकर, सावंतवाडीचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, जावेद खतीब, संदीप बांदेकर, संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्या अंकिता देसाई, अरुण देसाई, महिला शहर अध्यक्षा चित्रा भिसे, अनिल पावसकर, प्रशांत पांगम, गौरांग शेर्लेकर, बाळू सावंत, दीपक सावंत, विलास पावसकर, राखी कळंगुटकर, सोनल धुरी, बेला पिंटो, रोहिणी मडगावकर, अलिशा माठेकर, प्रगती माळवदे, ज्योती मुद्राळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे अर्धा तास हे आंदोलन करण्यात आले.त्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसह समज; पालकमंत्री निष्क्रिय : संजू परबबांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी ३२ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तेथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत समज देऊन सोडून दिले. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्र्यांवर टीका करीत आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय पालकमंत्री केसरकर असल्याचा आरोप केला. गोवा शासनाने घेतलेला रुग्णसेवेचा प्रश्न न सुटण्यामागे केसरकर जबाबदार आहेत.केसरकर यांचे गोव्याशी व्यावसायिक हितसंबंध असूनही हा प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलDeepak Kesarkarदीपक केसरकर