शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

सिंधुदुर्ग : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी मुंबई ते कन्याकुमारी सायकलने प्रवास : प्लास्टिक बंदीसाठी आयकर अधिकाऱ्यांचे समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:59 PM

स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

ठळक मुद्देआयकर अधिकारी संजय सावंत, मित्र ललित आकुटकर यांचे सायकलने समाजप्रबोधनस्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग, प्लास्टिक बंदीसाठी मुंबई ते कन्याकुमारी प्रवास सायकलवरून १७६० किमीचा मुंबई ते कन्याकुमारी प्रवास पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्याचे आवाहन

चौके : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

९ डिसेंबर रोजी मुंबई येथून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली. बुधवार सायंकाळी त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्या रात्री सावंत आणि त्यांचे सहकारी आकुटकर यांनी कुडाळ येथे वास्तव केले.

कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवासादरम्यान मार्गातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबून येथील शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पत्रके वाटून आणि मार्गदर्शन करून स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा वापर टाळला पाहिजे. तरच आपला परीसर स्वच्छ व हिरवागार ठेवता येईल. येणाऱ्या नवीन पिढीला प्रदुषण विरहीत वातावरण देणे ही आपलीच जबाबदारी आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर दोघांनी गोव्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यापैकी ललित आकुटकर हे मुंबई ते कोचीपर्यंत सायकल प्रवास करणार असून पुढील प्रवास संजय सावंत एकटेच करणार आहेत. त्यांच्या या सायकल प्रवासाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करासंत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सावंत यांनी सांगितले की, आपल्या सभोवतालचा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्रदुषित धुक्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. हे सर्व कशामुळे? तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा व प्लास्टिकचा अतिवापर, आपले समुद्र किनारेही प्लास्टिक व पाण्यात सोडण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे प्रदुषित होत आहेत.

भविष्यात आपल्याला जर आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान