Nagpur's Amit Samarth qualified for the longest race ride in the world | जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी नागपूरचे अमित समर्थ पात्र

ठळक मुद्देएकमेव भारतीय९१०० किमी अंतर २५ दिवसांत १५ टप्प्यात पूर्ण करण्याचे आव्हान


आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरासाठी भूषणावह असलेले सायकलपटू डॉ. अमित समर्थ हे ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल रेससाठी पात्र ठरले आहेत.
रशियातील मॉस्को ते व्लादीवोस्टोक असे ९१०० किमी अंतर २५ दिवसांत १५ टप्प्यात पूर्ण करण्याचे आव्हान असते. प्रो हेल्थ फाऊंडेशनचे संचालक असलेले समर्थ हे या रेससाठी पात्र ठरलेले एकमेव भारतीय आहेत.
अमित समर्थ यांनी यंदा जून महिन्यात पाच हजार किमी अंतराची ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ रेस ११ दिवस २१ तासांत पूर्ण केली होती. ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या पुणे- गोवा या ६४३ किमी अंतराच्या सायकल रेसचे ते विजेते राहिले. दहा ‘आयर्नमॅन’ टायटल्स जिंकणारे मध्य भारतातील ते एकमेव ‘आयर्नमॅन’ आहेत.
‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ रेस पुढील वर्षी मॉस्को येथून सुरू होणार असून व्लादीवोस्टोक येथे संपणार आहे. गेली तीन वर्षे सातत्याने हे आयोजन होत आहे. या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी अमित हे प्रायोजकांच्या शोधात असून त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title: Nagpur's Amit Samarth qualified for the longest race ride in the world
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.