शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सिंधुदुर्ग : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कामकाज सुरू : सावंतवाडीतून पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:07 IST

राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देनगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन कामकाज सुरू : सावंतवाडीतून पाठिंबा

सावंतवाडी : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी कामकाज मात्र सुरु ठेवण्यात आले होते. नगरपालिका एकजुटीचा विजय असो, हम सब कर्मचारी साथ है, सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी संघटनेचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.१ जानेवारी २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करणे, १९९३ पूर्वीचे तसेच २००० पूर्वीचे सर्व रोजंदारी कर्मचारी ३१ डिसेंबरपूर्वी कायम करणे अशा विविध ११ मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.

राज्यातील पालिका व नगरपंचायतीमधील कार्यरत असलेल्या संवर्ग, कंत्राटी, रोजंदारी, अनुकंपाधारक अशा विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने छेडण्यात आली. तसेच त्याचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाकडून दुर्लक्ष करुन मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही. दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी दिली.यावेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास आडारकर, शिवप्रसाद कुडपकर, दीपक म्हापसेकर, सुनील कुडतरकर, विजय बांदेकर, विठ्ठल मालंडकर, टी. पी. जाधव, विनोद सावंत, ड्युमिंग आल्मेडा, परवीन शेख, आसावरी केळबाईकर व इतर संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग