शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : माकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:00 IST

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देमाकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती जिल्ह्यात मलेरियाचे ४१ तर डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

सिंधुदुर्गनगरी : जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंतयावर्षीपासून डेंग्यू व लेप्टोच्या स्पॉट टेस्ट घेणे बंद केले असून अशा रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत व खलिपे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. जगताप, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कीटकजन्य आजारांसाठी पावसाळी हंगाम जोखमीचा आहे. कीटकजन्य आजारात वाढ होऊ नये यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाते. मात्र, तरीही जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते अद्यापपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे १३ रूग्ण आढळून आले आहेत तर माकडतापाचे १०९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मलेरियाचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.क्षयरोग रुग्णांना मिळणार संधीराष्ट्रीय सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. योग्य उपचाराबरोबर सकस व प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून नि-क्षय पोषण योजनेंतर्गत प्रत्येक क्षयरूग्णास दरमहा ५०० रूपये सकस आहार निधी रूग्णाच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये रूग्णास उपचार सुरू करताना, दुसरा हप्ता १ हजार रुपये दोन महिने पूर्ण केल्यावर, तर शेवटचा हप्ता उपचार पूर्ण झाल्यावर एक हजार रुपये दिला जाणार आहे., अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी वाय. बी. कांबळे यांनी दिली.स्पॉट टेस्ट बंदपूर्वी डेंग्यू किंवा लेप्टोची लक्षणे एखाद्या रुग्णास आढळल्यास त्यांची स्पॉट टेस्ट केली जात होती. मात्र, शासनाने आता स्पॉट टेस्टवर बंदी घातली आहे. या दोन आजारांच्या रूग्णांची आता यापुढे जिल्हा रूग्णालयात ब्लड टेस्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयात लॅब सुरू होणारसावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ व दोडामार्ग या चार तालुक्यातील रूग्णांची मनिपाल या संस्थेत मोफत तपासणी केली जाते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालयात लॅब सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इमारत व सर्व यंत्रणा उपलब्ध झाली असून मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास लवकरच या लॅबचा शुभारंभ करता येईल, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग