शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग :  संदेश पारकरांच्या सत्कारासाठी फडणवीस, ठाकरेंना आणणार : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:30 IST

संदेश पारकर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे उमेदवार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत आणू, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

ठळक मुद्देसंदेश पारकरांच्या सत्कारासाठी फडणवीस, ठाकरेंना आणणार : दीपक केसरकर कणकवलीतील सर्व विकासकामे पाच वर्षांत करणार, युतीची प्रचारसभा

कणकवली : संदेश पारकर हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे उमेदवार आहेत. त्यामुळे संदेश पारकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत आणू, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर व शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी येथील बस स्थानकानजीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, शिवसेनेचे वैभववाडी-कणकवली विधानसभा मतदारसंघप्रमुख जयेंद्र रावराणे, आमदार वैभव नाईक, राजश्री धुमाळे, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, शिवसेना-भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले,  सिंधुदुर्गातून वाईट संस्कृती हद्दपार करण्यासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज असून हे कठीण काम संदेश पारकर निश्चित पूर्ण करतील. संदेश पारकर यांनी कणकवलीची विकासकामे केली असून संदेश पारकर यांच्याबद्दल सर्वांना विश्वास आहे.

नारायण राणे यांनी नगरपंचायतींच्या विकासासाठी ५ वर्षांत फक्त २ कोटी आणले व मी प्रत्येक वर्षाला १५ कोटी आणले हा आमच्या दोघांच्यामध्ये फरक असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जान्हवी सावंत, राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रमोद जठार यांनी मानले.

विकासासाठी कणकवली दत्तक घेतली : रवींद्र चव्हाणनगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कोकणच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक असून कणकवलीच्या विकासासाठी शिवसेना-भाजपने कणकवली दत्तक घेतली आहे. सर्वांच्या अडीअडचणी सोडविणारा नेता संदेश पारकर शिवसेना-भाजपकडे असून जनता संदेश पारकर यांच्या पाठीशी आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार संवेदनशील असून गोरगरीबांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. २0१४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सर्र्वात जास्त नगरसेवक शिवसेना-भाजपचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते असल्यामुळे शहरांच्या विकासाची जबाबदारी शिवसेना-भाजपने घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने कणकवलीचा विकास करायचा असेल तर शिवसेना-भाजपला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपशी २४ तासांत काडीमोड घेतला : विनायक राऊतसंदेश पारकर नगराध्यक्ष होणार यात तिळमात्र शंका नाही. आमदार नीतेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. नारायण राणे खासदार भाजपचे. नगरपंचायतीची निवडणूक लढवतायत भाजपविरोधात. शिवसेनेशी काडीमोड घेतली. काँग्रेसबरोबर जमले नाही. भाजपची खासदारकी मिळवून २४ तासात भाजपाला काडीमोड देऊन भाजपविरोधात निवडणूक लढवणारा गद्दारीचा इतिहास सिंधुदुर्गातच रचला गेला. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले, नारायण राणे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. सिंधुदुर्गसाठी काहीही केलेले नाही. कणकवलीची सत्ता सुसंस्कृत संदेश पारकर यांच्याकडे द्यावी, असे आवाहन त्यानी केले.

कणकवलीकर मला निश्चितच साथ देतील : संदेश पारकरनारायण राणे यांचा करिष्मा संपला असून ते कुठल्याच निवडणुकीत विजयी होऊ शकत नाहीत. कणकवलीच्या जनतेची मागणी होती म्हणून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला. भाजपच्या नेत्यांची मागणी होती म्हणून मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे.

माझा कणकवलीकरांवर पूर्ण विश्वास असून ते मला नक्कीच साथ देतील, असा विश्वास शिवसेना-भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला. शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेना-भाजपला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग